
no images were found
भारताला मिळाले हायपरसोनिक मिसाइल ब्रह्मास्त्र !
भारताने मागील आठवड्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर जगातील मोजक्या देशांच्या पगंतीत भारत जाऊन बसला. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1500 किमी आहे. त्यात संपूर्ण पाकिस्तान येऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाच वेळी स्वातंत्र झाले. परंतु या दोन्ही देशांमध्ये सलोखा निर्माण होऊ शकला नाही. पाकिस्तान भारताला अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक वेळा पाकिस्तानला मार खावे लागते. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे. भारताने प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. परंतु पाकिस्तानमधून अण्वस्त्र हल्लाची धमकी अधूनमधून दिली जाते. आता भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यापूर्वी पाकिस्तानला दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण भारताला आता एक ‘ब्रह्मास्त्र’ मिळाले आहे. त्या ‘ब्रह्मास्त्र’ला नाव आहे हायपरसोनिक मिसाइल. रशिया, चीन, अमेरिकेनंतर हे आता भारताकडे आले आहे.
भारताने मागील आठवड्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर जगातील मोजक्या देशांच्या पगंतीत भारत जाऊन बसला. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1500 किमी आहे. त्यात संपूर्ण पाकिस्तान येऊ शकते. हायपरसोनिक स्पीडने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानातील कोणत्याही भागात सहज हल्ला करु शकते. तसेच हायपरोसोनिक स्पीडमुळे हे क्षेपणास्त्र एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करु शकते. त्यामुळेच त्याला भारताचे ब्रह्मास्त्र म्हटले जात आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाने त्याचा यशस्वी वापर केला आहे.
आंतराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ सांगतात, भारताच्या या यशानंतर पाकिस्तानी लष्कार भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देऊ शकणार नाही. पाकिस्तानी सेना आणि काही राज्यकर्ते अशी धमकी देत राहतात. नुकतेच पाकिस्तानी लष्कारातील निवृत्त उच्चाधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान ‘नो फर्स्ट यूज’ धोरणावर विश्वास ठेवत नाही.