Home राजकीय राजकीय नेते आणि उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क !

राजकीय नेते आणि उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क !

0 second read
0
0
27

no images were found

राजकीय नेते आणि उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क !

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाहू मार्केट यार्ड जवळील मतदान केंद्र येथे मतदान केले. त्यांनी, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक यांच्यासह कुटुंबांतील सदस्यासोबत मतदानाचा हक्का बजाला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर महापालिका येथील मतदान केंद्र येथे मतदान केले. यावेळी क्षीरसागर यांच्यासोबत पत्नी वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर हे कुटुंबांतील सदस्य होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नागरी सुविधा केंद्र,कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. कोल्हापूर उत्तरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्क येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भरत लाटकर, सूरमंजिरी लाटकर त्यांच्यासोबत होते.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिरोली पुलाची येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मतदान केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

Load More Related Articles

Check Also

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण –  सी.पी.राधाकृष्णन

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण – …