Home मनोरंजन करुणा पांडेने आत्मसात केला कानपुरी लहेजा

करुणा पांडेने आत्मसात केला कानपुरी लहेजा

6 second read
0
0
19

no images were found

करुणा पांडेने आत्मसात केला कानपुरी लहेजा

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने पुष्पा या एका धडाडीच्या आणि आशावादीची कहाणी विशद करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. मालिकेत पुष्पाची भूमिका करणाऱ्या करुणा पांडेने अलीकडेच या मालिकेत आणखीही एक भूमिका साकारली आहे. पुष्पा सारखीच दिसणारी बसंती तिने साकारली आहे. कथानकात अत्यंत नाट्यमय वळण येते आणि कानपूरमध्ये राहणारी बसंती मुंबईत पुष्पाच्या घरात येऊन पोहोचते, तर खरी पुष्पा कानपूरला बसंतीची जागा घेते.

मनमोकळ्या गप्पांच्या ओघात करुणा पांडेने सांगितले की, बसंतीची भूमिका निभावण्यासाठी तिने तिची बोलण्यातली कानपुरी लकब कशी आत्मसात केली. आणि एक अभिनेत्री असल्यामुळे दररोज काही तरी नवीन शिकण्यात कसा आनंद आहे, हे देखील तिने सांगितले.

करुणा म्हणते, “बसंतीची भूमिका करणे हे एक नवेच आव्हान होते. माझ्यासाठी हा जीवनातील एक अनोखा अनुभव आहे. बसंती अस्सल वाटावी यासाठी मला ग्रामीण जीवनातील बारकाव्यांचा अभ्यास करावा लागला, कारण बसंती कानपूरमदधल्या चुन्नीगंजची आहे. ग्रामीण जीवनाचा अभ्यास केल्यामुळे हा परफॉर्मन्स जिवंत करणे मला शक्य झाले.”

करुणा पांडे सांगते, “मी बोलण्यातल्या कानपुरी ढंग शिकायचे ठरवले. सुरुवातीस मला जड गेले कारण माझ्यासाठी तो लहेजा अगदी नवीन होता. प्रॉडक्शन टीमने माझ्यासाठी एक भाषा तज्ज्ञ ठेवला, जो सेटवर माझ्यासोबत राहतो आणि माझी चूक होते तेव्हा तो मला मार्गदर्शन करतो. यामुळे मला खूप मदत झाली, ती बोली अचूक साधता आली आणि बसंतीची व्यक्तिरेखा जिवंत करता आली.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…