Home स्पोर्ट्स “माझ्यावर अन्याय झालाय हे तर सपशेल सगळ्यांना दिसतंय ” : सिकंदर शेख

“माझ्यावर अन्याय झालाय हे तर सपशेल सगळ्यांना दिसतंय ” : सिकंदर शेख

2 second read
0
0
180

no images were found

“माझ्यावर अन्याय झालाय हे तर सपशेल सगळ्यांना दिसतंय ” : सिकंदर शेख

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा आपले नावे करेल, असे म्हटले जात होते. पण उपांत्य फेरीतील त्याच्या पराभवाने सर्वांना एकच धक्का बसला. पण त्याचा या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आयोजक आणि पंच यांच्यावर आरोप केले आहेत.
या पराभवाच्या वादावर स्वतः सिकंदर म्हणाला की, “माझी कुस्ती महेंद्र गायकवाड सोबत होती आणि पहिल्या हाफमध्ये ३० सेकंदाची मला वॉर्निंग दिली तेव्हा १ पॉईंट त्याच्या खात्यात गेला. पण पहिला हाफ संपल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याचे ३ पॉईंट्स झाले, त्यानंतर १-३ अशी कुस्ती चालू होती.” “जेव्हा निकालाला घुसलो होतो, तेव्हा टांग लावली तेव्हा ती टांग परफेक्ट बसली नव्हती. पूर्णपणे कमरेचा कब्जा माझ्या हातात होता. टांग माझी एका साईडला त्याच्या खांदयावर होती, जर ४ पॉईंट्स दयायचे असतील तर पूर्णपणे डेंजर पोझिशन पाहिजे, तेव्हा ४ पॉईंट्स असतात. इथे त्याला २ गुण त्यांनी द्यायलाच हवे होते, कारण त्याने टांग लावले आहे. २ पॉईंट त्याला आणि १ पॉईंट मला. त्यांनी ४-१ पॉईंट दिले आणि इथे चुकीचा निर्णय झालेला आहे.” पुढे सिकंदर म्हणाला. “या चुकीच्या निर्णयामुळे मला पुढे २ मिनटात कमबॅक करता आलं नाही आणि चुकीच्या निर्णयाचा पूर्णपणे मला एक वर्षाच्या मेहनतीचा फटका बसला आहे.”

पुढे सिकंदरला अन्याय झालाय का याबाबत विचारताच तो म्हणाला, “अन्याय झालाय हे तर सपशेल सगळ्यांना दिसतंय ना, आता मी सांगून काही उपयोग नाही. सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय आणि त्यांनाही दिसतंय की अन्याय काय झालाय.” इतकेच नव्हे तर त्याच्या सामन्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी देखील रोष व्यक्त केला आहे. स्वतः पैलवानकी न केलेल्या सिकंदराच्या वडिलांनी सांगितलं, ‘आम्ही हमाली करून त्याला मोठं केलं आहे. आमच्या मुलावर जो अन्याय झाला तो इतर पैलवानांवर होऊ नये.’ सिकंदरच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर एकच या कुस्तीच्या चर्चेला उधाण आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…