no images were found
सोनी सब लोकांची आवडती आगामी मालिका ‘तेनाली रामा’ रात्री 8 वाजता प्रसारित
सोनी सबने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या अनेक मागण्यांचा विचार करून आपली बहुप्रतीक्षित ऐतिहासिक मालिका तेनाली रामा साठी रात्री 8 ची वेळ या डिसेंबरमध्ये नियोजित केली आहे. आपली विनोदबुद्धी, मिश्किलपणा आणि सुबुद्धपणा घेऊन तेनाली रामा विजयनगर साम्राज्यात परततो, जिकडे त्याच्यासमोर नवीन आव्हाने उभी असतात. तेनाली चार मुलांना देखील मार्गदर्शन देतो आणि विजयनगरचे भावी संरक्षक म्हणून त्यांची जडणघडण करतो.
Insta link: https://www.instagram.com/reel/DCY8TvcyCEF/?igsh=d3dqMmxtcGhtd3Q2
सोनी सबने अलीकडेच या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये एकेकाळी विजयनगरच्या राजाचा सल्लागार असलेला तेनाली रामा आता बहिष्कृत आणि नागरिकांच्या रोषाला पात्र झाला आहे. जेव्हापासून हा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून चाहत्यांनी ही मागणी करण्यास सुरुवात केली आहे की, ही मालिका रात्री 8 वाजता प्रसारित करावी. लोकांच्या या मागणीचा मान राखून सोनी सबने आपले वेळापत्रक बदलले आहे आणि या मालिकेसाठी आता रात्री 8 ची वेळ नियोजित केली आहे.
या मालिकेत तेनाली रामाची शीर्षक भूमिका साकारत असलेला कृष्ण भारद्वाज म्हणतो,लोक ‘तेनाली रामा’वर किती प्रेम करत आहेत, हे पाहून मी भारावून गेलो आहे. या मालिकेच्या पुनरागमनाबाबतचा त्यांचा उत्साह स्पष्ट दिसतो आहे आणि सोनी सबने सोशल मीडियावर लोकांनी केलेल्या सूचनांचा मान राखला आहे आणि या मालिकेच्या प्रसारणासाठी रात्री 8 ची वेळ नक्की केली आहे. पुन्हा एकदा तेनाली रामा या महान भूमिकेत शिरताना मी रोमांचित झालो आहे. यावेळी आम्ही घेऊन येत आहोत नवीन कथा आणि नवी आव्हाने. कुटुंबं एकत्र होऊन तेनाली रामाच्या बुद्धीचातुर्याच्या कथांचा आस्वाद घेऊ शकतील.”