Home सामाजिक प्रकाशात रंग बदलणाऱ्या फ्रेम्ससोबत अपेक्षेपलिकडचा अनुभव घ्या

प्रकाशात रंग बदलणाऱ्या फ्रेम्ससोबत अपेक्षेपलिकडचा अनुभव घ्या

2 min read
0
0
65

no images were found

प्रकाशात रंग बदलणाऱ्या फ्रेम्ससोबत अपेक्षेपलिकडचा अनुभव घ्या

 

रे-बॅन®ने १९३७ पासून अद्भूत पद्धतीने नवनव्या रचनांमधून कालातीत डिझाइन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधत आयवेअरची निर्मिती केली आहे. आजही रे-बॅन® चेंजच्या सादरीकरणातून ही नाविन्यतेची परंपरा राखली गेली. ट्रान्झिशन® ने सज्ज ही प्रकाशानुसार बदलणारी फ्रेम आहे. रे-बॅन चेंजमध्ये प्रकाशाच्या स्थितीनुसार स्टाइलमध्ये ठळक बदल करण्याची क्षमता आहे. यूव्ही प्रकाशाच्या सानिध्यात आल्याने या फ्रेम्स आपला कलर टोन बदलतात. त्यामुळे तुम्ही बंद खोलीतून बाहेर पडल्यानंतर रंग बदलून तुम्हाला खास लुक मिळतो.

तुमच्यसोबतच पुढे पुढे जाताना रे-बॅन® चेंजने ओरिजनल वेफेरर आणि तशीच समकालीन स्टाइल असलेल्या वेफेरर® ओव्हल या स्टाइल्समध्ये क्रांतीकारी बदल केले आहेत. यात विविध अनोख्या पॅटर्न्सच्या रंगात सन आणि ऑप्टिकल स्टाइल्स उपलब्ध आहेत.

सेल्युलोज एसीटेटला हाताने वस्तू बनवण्याच्या पारंपरिक कलेची जोड देत या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण रे-बॅन चेंजच्या डिझाइनमध्ये प्रकाशाला प्रतिसाद देण्याची क्षमता देण्यात आली आहे. यातील फ्रेम्सचे अनोखे रंग आणि पॅटर्न्स ट्रान्झिशन फोटोक्रोमिक डाय वापरून तयार करण्यात आले आहेत. यूव्ही प्रकाशकिरणांच्या सानिध्यात आल्यानंतर लगेचच या फ्रेम्स रंग बदलतात.

या फ्रेम्स आठ खास रंगांमध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकाशात सर्व टप्प्यांवर रंग आकर्षक दिसतील अशा प्रकारे हे सर्व रंग अत्यंत सुयोग्यरित्या वापरण्यात आले आहेत. बंद जागेत पूर्ण पारदर्शक आणि बाहेर सुंदर रंगांमध्ये अशा या चेंज फ्रेम्स तुमच्या प्रत्येक लुकला साजेशी साथ देतात. या फ्रेम्समुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बहूविधता दाखवण्याची संधी मिळते. आपल्या आयुष्यातील छोट्यामोठ्या गोष्टी टिपत, आपल्या स्टाइलमधील, प्रत्येक हालचालीमधील बहूविधता जपण्याची संधी या जादुई स्टाइलमध्ये आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…