Home मनोरंजन कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या अभिनय करिअरमधील शिक्षणाच्‍या महत्त्वाबाबत

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या अभिनय करिअरमधील शिक्षणाच्‍या महत्त्वाबाबत

2 min read
0
0
19

no images were found

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या अभिनय करिअरमधील शिक्षणाच्‍या महत्त्वाबाबत

आपण आपल्‍या आवडत्‍या कलाकारांना पडद्यावर सर्वोत्तम अभिनय सादर करताना पाहतो तेव्‍हा वाटते की ते अभिनयासाठी जन्‍मले आहेत. पण, त्‍यांच्‍यापैकी अनेकांनी औपचारिक शिक्षणामध्‍ये तडजोड न करता रंगभूमीवर प्रखर प्रशिक्षण घेत आपली कला निपुण केली आहे. यंदा राष्‍ट्रीय शिक्षण दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील सुप्रसिद्ध कलाकार त्‍यांच्‍या गाथा सांगण्‍यासोबत अध्‍ययनाप्रती आवड व शैक्षणिक उपलब्‍धींनी त्‍यांच्‍या जीवनप्रवासाला दिलेल्‍या आकाराबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत रवी महाशब्‍दे (मालिका अटल’), स्मिता साबळे (मालिका भीमा’), हिमानी शिवपुरी (मालिका हप्‍पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (मालिका भाबीजी घर पर है’). मालिका अटल’मध्‍ये क्रिष्‍णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे रवी महाशब्‍दे म्‍हणाले, जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यात माझ्यामध्‍ये साहित्‍याबाबत आवड निर्माण झाली, ज्‍यामुळे मी कला विद्याशाखेमधून बॅचलर्स पदवी शिक्षण घेतले. कॉलेज दिवसांदरम्‍यान मी रंगभूमी व ड्रामा स्‍पर्धांमध्‍ये भाग घेतला, भूमिका सादर करण्‍यामधील बारकावे जाणून घेतले, ज्‍यामुळे माझ्यामध्‍ये अभिनयाप्रती आवड जागृत झाली. पदवी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर मी माझी अभिनय कौशल्‍ये निपुण करण्‍यासाठी अभिनय वर्कशॉप्‍समध्‍ये जायला लागतो, शैक्षणिक ज्ञानासह व्‍यावहारिक अनुभव घेतले. या समर्पिततेमुळे मी आज या टप्‍प्‍यावर पोहोचलो आहे. प्रेक्षक मला प्रतिभावान अभिनेता म्‍हणून ओळखतात आणि भूमिकांमध्‍ये सखोलता व प्रखरतेची भर करण्‍यासाठी माझे कौतुक केले जाते, पण माझ्या या सर्व उपलब्‍धींचे श्रेय माझ्या शिक्षणाला जाते.” मालिका भीमा’मध्‍ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, मी मुंबई युनिव्‍हर्सिटीमधून ह्युमन रिसोर्सेसमध्‍ये एमबीए केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्‍यापूर्वी मी केबिन क्रू सदस्‍य म्‍हणून देखील काम केले. या पदामुळे माझे संभाषण कौशल्‍य निपुण झाले आणि मला विविध व्‍यक्तिमत्त्वांची हाताळणी करण्‍याची शिकवण मिळाली. ह्युमन रिसोर्सेसमधील पार्श्‍वभूमीमुळे मी संस्‍थात्‍मक कौशल्‍यांसह निपुण झाले आणि मला लोकांबाबत समज, तसेच अभिनय कौशल्‍य अधिक उत्तम करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली वैशिष्‍ट्ये माहित झाली. हे अनुभव मी साकारणाऱ्या भूमिकांमध्‍ये मोहकता व समर्पकता आणतात, ज्‍यामुळे पडद्यावर उत्तम अभिनय सादर करण्‍यास मदत होते.” 

मालिका हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये कटोरी अम्‍माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी म्‍हणाल्‍या, माझी शैक्षणिक पार्श्‍वभूमी अद्वितीय आहे, जिने माझ्या अभिनय करिअरला आकार दिला आहे. मूळची देहरादूनची असलेली मी ऑर्गनिक केमिस्‍ट्रीमधून मास्‍टर्स पदवी शिक्षण घेतले, ज्‍यानंतर नवी दिल्‍लीमधील नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) येथे अभिनयाप्रती आवड पूर्ण केली. एनएसडी येथील प्रशिक्षणाने मला रंगभूमीमध्‍ये प्रबळ पाया रचण्‍यास, तसेच आज सुप्रसिद्ध अभिनेत्री म्‍हणून दर्जा मिळवण्‍यास मदत केली आहे. मला चित्रपट, टेलिव्हिजन व रंगमंचावर काही प्रतिष्ठित भूमिका साकारण्‍याचा अभिमान वाटतो. माझ्या शैक्षणिक उपलब्‍धी आणि कलांप्रती आवडीमुळे प्रबळ संयोजन तयार झाले, जे माझ्या परफॉर्मन्‍सना स्‍फूर्ती देते.” मालिका भाबीजी घर पर है’मध्‍ये विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्‍हणाले, तरूणपणापासून मला परफॉर्मन्‍सची आवड होती, पण सुरूवातीला मी हॉटेल मॅनेजमेंटमध्‍ये पदवी शिक्षण पूर्ण केले. या क्षेत्राने मला आंतरवैयक्तिक व संस्‍थात्‍मक कौशल्‍यांची शिकवण दिली, जी माझ्या अभिनय करिअरसाठी लाभदायी ठरली. कॉलेज काळामध्‍ये मला विविध व्‍यक्‍ती व अनुभव मिळाले, ज्‍यामुळे पात्रांमधील विशिष्‍टता सखोलपणे माहित होण्‍यासोबत माझा दृष्टिकोन अधिक सखोल झाला. हॉस्पिटॅलिटीमध्‍ये उत्तम सुरूवात झाली असताना देखील अभिनयाप्रती माझ्या आवडीने मला रंगभूमी व अभिनय कार्यशाळांकडे नेले, जेथे माझे खरे करिअर घडले.”  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली &nbs…