
no images were found
काय ‘आटा साटा’ परंपरेतील कर्तव्यभावनेतून निर्माण झालेल्या नात्यामध्ये खरे प्रेम फुलू शकते?
हाच प्रश्न ‘जाने अनजाने हम मिले’ ह्या झी टीव्हीवरील आगामी प्राईमटाईम मालिकेतून प्रेक्षक स्वतःला विचारतील. रोचक अशा ‘आटा साटा’ लग्नाची परंपरा आजही गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. ह्या खास व्यवस्थेमध्ये एका घरातील मुलगी दुसऱ्या घरातील मुलासोबत लग्न करते आणि वराच्या बहिणीचे लग्न वधूच्या भावासोबत केले जाते, त्यामुळे परस्पर दायित्वातून घनिष्ठ कौटुंबिक बंध निर्माण होतात. ह्या परस्पर संबंधांमुळे दोन्ही जोड्यांचा आनंद आणि स्थैर्य परस्परावलंबी बनतो आणि एक नाजूक संतुलन प्रस्थापित होते ज्याचा प्रभाव दोन्ही परिवारांवर पडतो. 11 नोव्हेंबर रोजी ‘जाने अनजाने हम मिले’चा प्रीमिअर होत असून झी टीव्हीवरील ही बोल्ड कथा अशा व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या नातेसंबंधांमधील नाजूकपणाचा शोध घेते आणि त्यातील भावविश्वामध्ये अपारंपारिक पद्धतीने डोकावते.
ह्या मालिकेतून दोन खंबीर मनाच्या प्रमुख व्यक्तिरेखा – रीत आणि राघव यांची ओळख करून दिली जाते, जिथे रीत आपल्या भावाच्या आनंदासाठी प्रेमाकरिता नाही तर एक ‘गॅरंटी’ म्हणून लग्न करण्याचा धक्कादायक निर्णय घेते. रीतची भूमिका आयुषी खुराणा साकारत असून ती ग्वाल्हेरमध्ये राहत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अतिशय निडर आणि स्वतंत्र आणि हजरजबाबी अशी पत्रकार आहे. बुरसटलेल्या सामाजिक नियमांना आव्हान देण्यासाठी ती अनेकदा पुढाकार घेते आणि जुन्या विचारसरणीसमोर प्रश्न उपस्थित करते. राघवची भूमिका देखणा अभिनेता भरत अहलावत साकारत आहे. तो दिसायला कठोर स्वभावाचा असला तरी मनाने मात्र तो घायाळ आहे. एक यशस्वी बांधकाम व्यवसाय तो सांभाळत असून त्याचे आपली बहिण उन्नतीवर नितांत प्रेम आहे. परिस्थितीमुळे त्याच्यावर आटा साटा पद्धतीनुसार लग्न करण्याची सक्ती केली जाते, ज्यामुळे त्याची बहिण उन्नतीचे भविष्य सुरक्षित होऊ शकेल. उन्नतीचे लग्न रीतचा भाऊ ध्रुवसोबत व्हावे यासाठी राघव उन्नतीसोबत लग्न करण्याची अट घालतो, ज्यामुळे रीत जणू त्याच्या ‘गहाण’ आहे, म्हणजे जर उन्नतीला तिच्या नवीन घरामध्ये काही त्रास झालाच तर त्याचे परिणाम रीतलाही राघवच्या घरात भोगावे लागतील. ‘जाने अनजाने हम मिले’च्या गाभ्याशी असलेला प्रश्न हा साधा आणि तरीही खोल अर्थ असलेला आहेः काय कुटुंबाच्या सन्मानासाठीच्या कर्तव्यभावनेतून निर्माण झालेल्या नात्यामध्ये प्रगल्भता येऊन त्याचे प्रेमावर आधारलेल्या खऱ्या भागीदारीमध्ये रूपांतर होऊ शकते का?
झी टीव्हीचे चीफ चॅनल ऑफिसर श्री.मंगेश कुलकर्णी म्हणाले, “भारतात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसते, तर वेगवेगळी क्षेत्रे आणि समुदायांमधील विभिन्न परंपरा आणि सांस्कृतिक बारकाव्यांच्या माध्यमातून आयुष्याचा उजळ सोहळा असतो. आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या ह्या सोहळ्याला आकार देणाऱ्या खास परंपरा जाणून घेण्याची नैसर्गिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. ‘जाने अनजाने हम मिले’सह आम्ही आजही भारतातील काही भागांमध्ये अस्तित्वात असलेल्या आटा साटा लग्न परंपरेला केंद्रस्थानी ठेवून बनवलेले कथानक प्रस्तुत करत आहोत. ह्या वेगळ्या चालीरीतीमुळे आमच्या कथेला एक भावनिक खोली मिळते आणि प्रेक्षक एका अशा जगाकडे आकर्षित होतात जिथे प्रेम आणि कुटुंबाचा सन्मान एकमेकांसमोर उभे ठाकतात. रीत आणि राघव यांच्या प्रवासाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना एका शक्तीशाली कथेचा अनुभव घेण्यासाठी निमंत्रित करत आहोत जिथे केवळ कर्तव्यातून निर्माण झालेल्या लग्नातही प्रेम फुलत जाते.”
सोनल ए.ककरची संकल्पना आणि रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स प्रा.लि. अंतर्गत गोल्डी बहल व सोनल ए.ककर निर्मित ही मालिका जुन्या परंपरा आणि आजच्या पिढीच्या प्रगतीशील मूल्ये यांच्यातील संघर्षाकडे लक्ष वेधतो आणि एक गहन भावनिक कथा निर्माण करते. लेखिका–निर्माती सोनल ए.ककर म्हणाल्या, “‘जाने अनजाने हम मिले’सह आम्हांला एक अशी कथा आणायची होती जी केवळ आटा साटा परंपरेवर प्रकाश टाकणार नाही तर त्यामुळे आकार मिळत असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याबद्दलही आहे. रीत आणि राघवचा प्रवास परिवर्तनशील आहे. हे लग्न दिसायला व्यावहारिक वाटत असले तरी त्यात सखोल भावनिक नाते निर्माण होण्याचीही शक्यता आहे. जेव्हा एका नात्यामध्ये दोन ‘अल्फा’ एकत्र येतात तेव्हा ठिणग्या कशा उडतात आणि त्यांचे प्रगल्भ होत जाणाऱ्या नात्याला त्यांच्यातील गहन डायनॅमिक्स कसा आकार देतात त्याबद्दल ही मालिका आहे.”
निर्माता गोल्डी बहल म्हणाले, “झी टीव्हीसोबत दीर्घ काळापासून माझी भागीदारी असून त्यामुळे आमच्या कथाकथनाच्या दृष्टीकोनाला आकार मिळण्यासाठी मोठी मदत झाली आहे. ‘जाने अनजाने हम मिले’सह आजच्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडींशी बातचीत करणाऱ्या ह्या खास सांस्कृतिक परंपरेचा शोध घेताना आम्ही उत्साहात आहोत. ह्या भागीदारीमुळे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करणारेच नव्हे तर त्यांना आपलेसे वाटणारे रोचक कॉन्टेन्ट निर्माण करण्याप्रतिची आमची वचनबद्धता दिसून येते. मला खात्री आहे की ही मालिका ह्या उद्योगातील आमची उपस्थिती भक्कमच करणार नाही तर विभिन्न स्तरांवरील प्रेक्षकांसोबत आमचे अर्थपूर्ण नातेही प्रस्थापित करेल.”
रीतची भूमिका जीवंत करणारी आयुषी खुराणा उत्साहाने म्हणाली, “मला नेहमीच बळकट व्यक्तिरेखा साकारायला आवडल्या आहेत आणि रीत अशीच एक तरूण स्त्री आहे. ती बिनधास्त, निर्धास्त आणि सामाजिक चालीरीतींबद्दल प्रश्न उपस्थित करायला घाबरत नाही, त्यामुळे तिची भूमिका साकारणे आकर्षक आणि आव्हानात्मकही बनते. आटा साटा परंपरेबद्दल कळल्यानंतर परिवार आणि सांस्कृतिक डायनॅमिक्सचे विभिन्न स्तर यांच्या दिशेने माझे डोळे उघडले. रीतच्या प्रवासासोबत प्रेक्षकांनी कनेक्ट व्हावे यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
राघवची भूमिका करणारा भरत अहलावत म्हणाला, “जाने अनजाने हम मिले ही टिपीकल प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन केवळ एका बंधनामुळे निर्माण झालेल्या लग्नातून मार्ग काढणाऱ्या रीत आणि राघव यांच्या परंपरा आणि व्यक्तिमत्त्वांमधील संघर्ष अधोरेखित करतो. राघवची व्यक्तिरेखा जटिल आहे आणि त्याची भूमिका निभावणे परिवर्तनशील होते. ह्या भूमिकेने मला काहीतरी नवीन प्रदान केले आहे आणि तीव्र भावना व शक्तीशाली नातेसंबंधांनी भरलेल्या ह्या कथेमध्ये राघवचा प्रवास उलगडताना प्रेक्षकांनी पाहावे यासाठी मी उत्साहात आहे.”
मुंबईमध्ये ह्या मालिकेच्या लॉंच इव्हेंटमध्ये स्टॅन्डअप कॉमेडियन अबिजीत गांगुली याने आपल्या खास शैलीने उपस्थितांचे मनोरंजन केले आणि नातेसंबंध आणि लग्नाच्या गंमतीदार गोष्टी आणि वास्तविकतेचा शोध घेतला. लोक अनुभव घेत असलेल्या विभिन्न नातेसंबंधांच्या बाबतीत त्याच्या विनोदी दृष्टीकोनाने ह्या मालिकेसाठी व्यवस्थितपणे मंच प्रस्थापित केला आणि मालिकेतील प्रमुख कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखांची विनोदी पद्धतीने आणि पूर्ण माहितीसह ओळख करून दिली.
काय सामाजिक रूढींना आव्हान देण्यामध्ये अभिमान वाटून घेणारी रीत ह्या अशा व्यावहारिक वाटणाऱ्या लग्नाचा स्वीकार करू शकेल? आणि आपल्या बहिणीबद्दलच्या अपार प्रेमासाठी ‘आटा साटा’ परंपरेनुसार लग्न करण्याचा निर्णय घेणारा राघव रीतसोबत त्याचे पटत नसल्याच्या वास्तविकतेसोबत समझौता करू शकेल का?