no images were found
या डिसेंबरमध्ये सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ऐतिहासिक मनोरंजक मालिका तेनाली रामा
सोनी सब वाहिनीने टेलिव्हिजनवर महान तेनाली रामाच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. या डिसेंबरमध्ये ‘तेनाली रामा’ ही मालिका सुरू होत आहे. ही मालिका तेनाली रामा या कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण ताजी करेल. जीवनातील कठीण प्रसंगातील त्याच्या प्रसंगावधानाचे कौतुक करेल.
एकेकाळी विजयनगरच्या राजाचा सल्लागार असलेला तेनाली आता एक पतित नायक आहे. त्याला बहिष्कृत करण्यात आले आहे आणि लोकांच्या रोषाचा त्याला सामना करावा लागत आहे. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, विनोद बुद्धी आणि आकर्षक स्वभाव याबद्दल ओळखल्या जाणाऱ्या तेनालीला आपला उद्देश गवसतो आणि एका घोंघावणाऱ्या संकटातून राज्य वाचवण्यासाठी तो पुन्हा विजयनगरात येतो. केवळ चातुर्य नाही तर अनेक गुणांनी संपन्न असलेला तेनाली सहानुभूती आणि भावनात्मक गहनता घेऊन परतला आहे, ज्यामुळे आता तो पूर्वीपेक्षाही जास्त गुणवान आणि समर्थ झाला आहे!
या मालिकेविषयी बोलताना, मालिकेत तेनालीची भूमिका करत असलेला अभिनेता कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली हे भारताच्या सुवर्ण युगातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. प्रेक्षकांना त्याच्यात एक समजूतदार व्यक्ती आणि मार्गदर्शक दिसेल आणि लहान-थोर सर्वांना तो आपलासा वाटेल. त्याच्या प्रवासात न्याय, समानता, सत्ता संघर्ष यांसारख्या आजच्या काळातील समस्यांचे प्रतिबिंब देखील दिसेल. त्यामुळे आधुनिक भारताशी देखील हे व्यक्तिमत्त्व सुसंगत आहे. मात्र हे सारे विनोदाच्या अंगाने उलगडेल. इतक्या वर्षांपासून ही व्यक्तिरेखा जनमानसात आजही जिवंत आहे. आता ती सुपरिचित आणि त्याच वेळी एका वेगळ्या ढंगाने पडद्यावर साकार करण्यास मी उत्सुक आहे.”