
no images were found
हॉस्पीटलनी त्यांचेकडील सुविधा व त्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावावेत
कोल्हापूर : सर्व हॉस्पीटलनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व त्यांचे दरपत्रक हॉस्पीटलच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हॉस्पीटलनी महाराष्ट्र शुश्रुषा गृह नोंदणी 2021 (सुधारित) अंतर्गत नोंदणीकृत सर्व वैद्यकिय व्यावसायिकांनी आपल्या रूग्णालयाच्या दर्शनी भागात सर्वांना दिसतील अशा पद्धतीने रूग्ण हक्क सनद, हॉस्पीटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा व त्यांचे दरपत्रक प्रसिध्द करावेत. त्याचबरोबर तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री नंबरसह) प्रसिध्द करुन शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.