Home मनोरंजन ‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन

11 second read
0
0
30

no images were found

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन

      आमचा चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक पोलिस ड्रामा आहे. यात “पंडत” हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरले गेले आहे. ही कथा एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांवर आधारित आहे. याचा कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाशी संबंध नाही, तसेच कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही.

      एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी माझ्या कामाकडे मोठ्या जबाबदारीने पाहतो आणि नेहमी विचारपूर्वक आणि आदराने कथा मांडतो. हा चित्रपटही माझ्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच प्रामाणिक हेतूने आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीच तयार केला गेला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे काही प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्यांच्या भावनांचा मनापासून आदर करतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, सध्या आम्ही चित्रपटाशी संबंधित सर्व प्रचार साहित्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मते, हा चित्रपट पूर्ण पाहून आणि त्याची कथा समजून घेऊनच त्यावर मत द्यावे, फक्त काही भाग पाहून निष्कर्ष काढू नये. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यास मी उत्सुक आहे. 

https://www.instagram.com/p/DUZrQONk1Eq/?igsh=MTRvZmVmbG8yNHVwNg==

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…