no images were found
यादें मालिकेत कृष्णा भारद्वाजची एन्ट्री
सोनी सब ची यादें मालिका भावनिक कथाकथन, रोचक वैद्यकीय प्रकरणं आणि अनपेक्षित वळणांमुळे प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवते. डॉ. देव मेहता (इक़बाल खान) आणि हॉस्पिटल टीम वेगवेगळ्या अनोख्या वैद्यकीय रहस्यांचा शोध घेत असताना, आता एक नवीन केस सगळ्यांना वास्तव आणि भ्रम यात फरक ओळखायला भाग पाडणार आहे.
कथानकात नवा ट्विस्ट आणत अभिनेता कृष्णा भारद्वाज विशेष भूमिकेत दिसणार आहे सतेन्द्र तिवारी (सट्टू) म्हणून. त्याची गूढ अवस्था पाहून त्याच्या कुटुंबीयांसह डॉक्टरही उत्तर शोधत आहेत. सगळ्यांना वाटतं की तो आपल्या मृत पत्नीच्या आत्म्याने पछाडला आहे, पण डॉ. देव आणि हॉस्पिटल टीम खरं काय घडतंय हे शोधण्यास कटिबद्ध आहेत. जसजसे तपशील समोर येतात, तसतसे हे प्रकरण अधिक गोंधळात टाकणारं ठरतं. प्रत्येक नवीन क्ल्यू नवे प्रश्न निर्माण करतो आणि लवकरच सट्टूचं प्रकरण हॉस्पिटलने पाहिलेल्या सर्वात विचित्र रहस्यांपैकी एक बनतं.
सट्टू खरंच मृत पत्नीच्या आत्म्याने पछाडला आहे का, की यामागे दुसरं काही सत्य दडलं आहे?
आपल्या एन्ट्रीबद्दल बोलताना कृष्णा भारद्वाज म्हणाला, “ही भूमिका मला मिळाली तेव्हा मी खरोखरच उत्साहित झालो कारण सट्टू हा मी याआधी केलेल्या कोणत्याही पात्रापेक्षा वेगळा आहे. वरकरणी तो साधा माणूस वाटतो, पण आतून खूप भावनिक संघर्ष चालू असतो. या भूमिकेचं खास आव्हान म्हणजे मला फक्त सट्टूचं पात्र नाही तर त्याच्या पत्नीचं पात्रही साकारावं लागलं. त्या दोन वेगळ्या ऊर्जा आणि मानसिकतेत स्विच करणं हे मला अभिनेता म्हणून खूप रंजक वाटलं. या प्रकरणात रहस्य, भावना आणि अनपेक्षित वळणं आहेत, ज्यामुळे ते खूप आकर्षक बनतं. Sony SAB वर ‘यादें’सोबत परत येताना मला खूप आनंद होत आहे.”