no images were found
“माझ्या बहिणीप्रमाणे मी सेहजसाठीसुद्धा कायम असेन ”
झी टीव्ही आपली नवीन मालिका ‘जाने अनजाने हम मिले’च्या सुरूवातीसाठी सज्ज आहे. ही मालिका रोचक अशा आटा साटा लग्न परंपरेबद्दल असून ही चाल अजूनही गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अस्तित्वात आहे. हे बोल्ड कथानक कुटुंबावरील प्रेमाचा आधार असलेल्या नातेसंबंधांच्या जटिल डायनॅमिक्सकडे अपारंपारिक दृष्टीने पाहते. ह्या मालिकेतून दोन आधुनिक आणि खंबीर मनाची प्रमुख जोडी, स्वतंत्र आणि हजरजबाबी अशी पत्रकार रीत (आयुषी खुराणा) आणि दिसायला कठोर स्वभावाचा तरी मनाने मात्र घायाळ राघव (भरत अहलावत) यांची ओळख करून दिली जाईल, जिथे रीत प्रेमासाठी नाही तर आपल्या भावाच्या आनंदासाठी ती एक ‘गॅरंटी’ बनून लग्न करण्याचा धक्कादायक निर्णय घेते. परिवाराचा हिस्सा असल्याबद्दल कर्तव्य म्हणून घेतलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली निर्माण झालेल्या लग्नामध्ये काय खरंच प्रेम फुलू शकते का याचा शोध ह्या मालिकेतून घेण्यात येईल.
एका कलाकारासाठी ऑनस्क्रीन केमिस्ट्री निर्माण करणे एक समाधानकारक अनुभव असू शकतो, खासकरून तेव्हा जेव्हा सहकलाकारासोबत काम करणे अगदी नैसर्गिक असेल तर प्रत्येक दृश्य अगदी सहजपणे साकारले जाऊ शकते. भरत अहलावतचे अगदी हेच आहे. तो ह्या मालिकेत सेहज राजपूत साकारत असलेल्या उन्नतिचा तिचे रक्षण करणाऱ्या मोठ्या भावाच्या रूपात आहे. भरतने सांगितले की सेहजसोबत भावाचे नाते साकारणे अगदी नैसर्गिक वाटते कारण त्याला खरी धाकटी बहिण आहे आणि त्यामुळे भावाबहिणीचे नाते तो व्यवस्थित जाणतो. भरत आणि सेहज यांच्यातही भावाबहिणीसारखेच नाते निर्माण झाले असून ते ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही चमकत आहे.
भरत म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा सेहजला भेटलो तेव्हाच आमच्यामध्ये लगेचच मैत्री झाली. जसा माझ्या घरी मी माझ्या बहिणीची काळजी घेतो, तसाच सेटवर सेहजचीही काळजी घेतो. तिची मस्ती, तिची विनोदबुद्धी, सेटवर ज्याप्रकारे ती मला त्रास देते, त्या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्याच बहिणीसोबत काम करत असल्याची भावना मनात निर्माण होते. आम्ही जेव्हा भावाहिणीची दृश्ये साकारत असतो, तेव्हा आम्हांला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. ती दृश्ये अगदी नैसर्गिकपणे चित्रीत होतात. जेव्हा कॅमेरा रोल व्हायला सुरूवात होते, आम्ही सेटवर खूप मजा करतो आणि जेव्हा चित्रीकरण करत नसतो, तेव्हा आम्ही एकत्र हसतो, खातो, आमच्या ब्रेक्समध्ये कॉफी प्यायला जातो आणि आमचा एकत्र समय छान व्यतीत करतो. माझ्या बहिणीप्रमाणे मी सेहजसाठीसुद्धा कायम असेन आणि मला आशा आहे की ह्या मालिकेसोबत आमच्यातील मैत्रीही उत्तरोत्तर वाढत जाईल.” कलाकारांमध्ये मैत्री व्हायला सुरूवात झाली असताना प्रेक्षकांसाठी ही केमिस्ट्री ऑनस्क्रीन पाहणे रोचक ठरेल.