Home मनोरंजन ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुशला श्रीराम आणि सीतेच्या वियोगाचे सत्य समजले

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुशला श्रीराम आणि सीतेच्या वियोगाचे सत्य समजले

6 second read
0
0
50

no images were found

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुशला श्रीराम आणि सीतेच्या वियोगाचे सत्य समजले

 

सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची दिव्य कथा विशद केली आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) भव्य दिव्य अशा अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी आणि आपले आदर्श श्रीराम आणि सीता यांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येस जायला निघतात.

अयोध्येला जात असताना रस्त्यात लव आणि कुश एकाराक्षसापासून एका मुलाचे प्राण वाचवून त्याच्या अंध माता-पित्याला मदत करतात. ते माता-पिता कृतज्ञतेने त्यांना सरस्वती देवीची वीणा भेट देतात. ते अयोध्येच्या जवळ येतात, तेव्हाच श्रीरामांनी अश्वमेध यज्ञासाठी निवडलेला अश्व सुटून या दोन भावांकडे पोहोचतो. एका प्रेरणेने लव आणि कुश त्या घोड्यावर “सीता राम” असे लिहितात, ज्यातून आपल्या आराध्यावरील त्यांची अढळ श्रद्धा दिसून येते. जेव्हा ते अयोध्येस पोहोचतात, तेव्हा महालात प्रवेश करण्यास त्यांना मज्जाव करण्यात येतो. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे दोघे कोवळे भाऊ त्या दिव्य विणेवर सूर छेडून गाऊ लागतात आणि आपल्या गाण्यातून रामायण कथन करतात. त्यांचे ते दिव्य संगीत ऐकून हनुमान (निर्भय वाधवा) भावुक होतो आणि श्रीरामाला या दोन दिव्य मुलांविषयी सांगतो. अयोध्येत ही दोन दिव्य मुले आली असल्याचे तो सांगतो.

अखेरीस, जेव्हा लव आणि कुश श्रीरामाला भेटतात, तेव्हा त्यांची नजर सीतेच्या लखलखत्या सुवर्ण प्रतिमेवर पडते आणि पहिल्यांदाच त्यांना त्या दोघांच्या वियोगाचे हृदयद्रावक सत्य समजते. त्या दोघांना प्रचंड धक्का बसतो, ते सैरभैर होतात आणि सीतेचा त्याग का केला असा सवाल ते श्रीरामाला विचारतात.

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारा सुजय रेऊ म्हणतो, “श्रीराम म्हणून हे दृश्य माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. लव आणि कुश यांच्या प्रतिक्रियेवरून हे समजते की, महान आदर्शांची कसोटी देखील कठीण पर्यायांनी होते. श्रीराम आणि सीतेचा वियोग अत्यंत क्लेशदायक होता, पण एक पती म्हणून अनंत वेदना त्याला झाल्या, तरी एक राजा म्हणून त्याच्या कर्तव्यदक्षतेसाठी तो आवश्यक होता. मला आशा आहे की, प्रेक्षकांना त्याच्या संघर्षाची तीव्रता आणि खोली जाणवेल आणि त्यांना हे समजेल की खरे धैर्य आणि खरे बळ मोठ्या कल्याणासाठी स्वसुखाचा त्याग करण्यातच असते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…