
no images were found
भावजयीच्या मदतीने मुलीनेच आपल्या आईची हत्त्या केली
चंद्रपूर चंद्रपूर (ता. सिंदेवाही) जिल्ह्यातील पोटच्या मुलीने भावजयीची मदत घेत आपल्याच आईची हत्त्या केल्याची घटना घडली. हत्येप्रकरणी पोलिसांकडून मुलीबरोबरच भावजयीलाही अटक करण्यात आली आहे. . त्या दोघींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे दुसऱ्या मुलीने आई बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. तपासानंतर या हत्याकांडाचा खळबळजनक घटनाक्रमही उघडकीस आला.
सिंदेवाही तालुक्यात नलेश्वर इथं तानाबाई सावसागडे ही 65 वर्षांची महिला राहत होती. रंजना सोनावणे हिने आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्या आपली आई तानाबाई सावसागडे यांच्या शोधात होत्या. पण आई बेपत्ता असल्यानं त्यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तानाबाई यांच्या मुलीला आणि सुनेला ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून वास्तव पोलिसांच्या निदर्शनास आले. शेतीच्या वादातून तानाबाई यांच्या मुलीनेच भावजयीच्या मदतीने आईच्या हत्येचा कट रचला होता.
हत्त्येचे कारण – आपल्या आईची वंदना आणि त्यांची भावजय चंद्रकला यांनी नाक आणि तोंड दाबून हत्या केली होती. पोलिसांच्या तपासात त्यांनी आपण केलेल्या कृत्याची कबुलीदेखील दिली. फक्त हत्या नव्हे, तर त्या दोघींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह जमिनीत पुरला होता. 3 ऑक्टोबरला 65 वर्षीय तानाबाई यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचं कारण उलगडण्यातही पोलिसांना यश आले. शेतीच्या वादातून मुलगी वंदना आणि भावजय चंद्रकला यांनी तानाबाई यांची हत्त्या केली. या दोघींनाही सिंदेवाही पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.