Home सामाजिक कोल्हापूर अर्बनच्या निवडणुकीत कणेरकर- निगडे थेट लढत

कोल्हापूर अर्बनच्या निवडणुकीत कणेरकर- निगडे थेट लढत

2 second read
0
0
66

no images were found

कोल्हापूर अर्बनच्या निवडणुकीत कणेरकर- निगडे थेट लढत

कोल्हापूर : कोल्हापुरातील दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक ही एक नावाजलेली व नामांकित बँक आहे. या बँकेला तब्बल शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून आणि भास्करराव जाधव यांच्या प्रेरणेतून बँकेची उभारणी झालेली आहे. बँकेची सभासद संख्या २८ हजार इतकी असून बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल तर बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये यांची थेट लढत होण्याचे संकेत आहेत. दोन्ही बाजूंनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारांच्या निश्चितीपासून प्रचार आणि सभासद संपर्कापर्यंत रणनिती आखली जात आहे.

दि कोल्हापूर अर्बन बँकेचा नावलौकिक चांगलाच असून सहकारातील जाणत्या मंडळींनी बँकेचे नेतृत्व केले आहे. बँकेच्या निवडणुकीत यंदा बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांचे जुने पॅनल तर माजी अध्यक्ष उमेश निगडे यांचे नवे पॅनेलमध्ये आमने सामने येण्याची शक्यता आहे. सत्तारुढ पॅनेलमध्ये बहुतांश विद्यमान संचालकांचा समावेश राहील असे चित्र असून बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अॅड शामराव शिंदे यांचे पुतणे अॅड प्रशांत शिंदे हे जुन्या पॅनलमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. बँकेचे माजी अध्यक्ष कणेरकर व अन्य संचालक मंडळी पॅनेल बांधणीच्या  आखणीसाठीच्या तयारीत आहेत. दरम्यान दुसरीकडे बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल निवडणूक लढविणार आहे. राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेल या नावांनी निगडे यांनी पॅनेलची घोषणा केली आहे. निगडे यांच्यासोबत चार विद्यमान संचालक असल्याचा दावा आहे. बँकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी आहे. १४ ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी घोषित करण्यात येईल; अर्ज छाननीनंतरच दोन्ही पॅनेलकडून उमेदवार व पॅनेलची घोषणा होईल.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …