
no images were found
ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन
अनेकविध भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटविणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी आज निधन झाले. बाली हे काही दिवसांपासून आजारी होते. 90च्या दशकात अरुण बाली यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आजवर त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’सह अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. विविध चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
गेल्या काही काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या मुलीने माध्यमांना त्यांच्या तब्येतीची माहिती देत सांगितले होते की, आपले वडील म्हणजेच अभिनेते अरुण बाली मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त होते. ज्यामध्ये नसा आणि स्नायू यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. या कारणामुळे ते गेल्या काही काळापासून सतत आजारी होते. त्यानंतर त्यांना बऱ्याच वेळेला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, आज त्यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.