no images were found
कोल्हापूर, दि. 4 : मान्सून सुरु झाला तरी पावसाने मात्र तुरळक हजेरी लावत महिनाभर दडी मारली होती. जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाने दमदार हजेरी लावली. खोळंबलेली शेतीची कामे आणि पेरण्या यामुळे चिंतेत असलेला शेतकरी सुखावला.
आज सकाळ पासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने संततधार वृष्टी झाली. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला यामुळे सर्वच नद्या, ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत.
जिल्ह्यात आज सकाळी 10.48 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 0.8 मिमी, शिरोळ – 2.7 मिमी, पन्हाळा- 2.6 मिमी, शाहूवाडी- 12.6 मिमी, राधानगरी- 2.5 मिमी, गगनबावडा-13.9 मिमी, करवीर- 0.5 मिमी, कागल- 1.5 मिमी, गडहिंग्लज- 2.4 मिमी, भुदरगड- 15.4 मिमी, आजरा- 4.9 मिमी, चंदगड- 6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून 1 हजार 50 तर अल्लमट्टी धरणातून 451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 38.88 दलघमी, वारणा 307.99 दलघमी, दूधगंगा 187.26 दलघमी, कासारी 27.19 दलघमी, कडवी 22.06 दलघमी, कुंभी 30.18 दलघमी, पाटगाव 37.56 द.ल.घ.मी., चिकोत्रा 19.35 द.ल.घ.मी., चित्री 17.06 दलघमी, जंगमहट्टी 13.99 दलघमी, घटप्रभा 25.96 दलघमी, जांबरे 8.48 दलघमी, आंबेआहोळ 18.51, कोदे (ल.पा) 1.98 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.04 फूट, रुई 43 फूट, इचलकरंजी 40, तेरवाड 37.06 फूट, शिरोळ 27 फूट, नृसिंहवाडी 20.06 फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली 4.06 फूट व अंकली 4.05 फूट अशी आहे.
Attachments area