
no images were found
कोल्हापूर: यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा असेल तर तेच एकमात्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. परीक्षेच्या गराजाना समजून घेवून योग्य नियोजन करणे आणि त्यात सातत्य राखणे आवश्यक असते असे प्रतिपादन यूपीएससी यशवंतांनी केले.
राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभगृह येथे विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आयोजित यूपीएससी यशवंतांच्या सत्कार समारंभात श्री.रामेश्वर सब्बनवाड व श्री.ओंकार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंतांनी आपल्या अनुभवकथनासह विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.