
no images were found
दुर्गा विसर्जनावेळी मोठ्या दुर्घटनेत ८ जण दगावले
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गा पुजा विसर्जन सुरु असताना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने. नदीच्या पाण्यात बुडून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री जलपाईगुडी जिल्ह्यातील माल नदीत घडली. विसर्जनासाठी मोठ्याप्रमाणात नदीमध्ये लोक जमले होते. त्याचवेळी अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडिओत काही लोक विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरल्याचं दिसते. लोक नदी पात्रात उतरत असताना नेमक्या त्याचवेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो. नदीची पाणी पातळी वाढते आणि त्यामध्ये लोक अडकतात हे त्या व्हिडिओमध्ये दिसते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले. आता पर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोक मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात आले होते. त्यावेळी पाणी पातळी कमी होती. मात्र, अचनाक पूर येऊन पाण्याची पातळी वाढल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात अडकले. एकूण नदीच्या पुरात कितीजण अडकले याची माहिती मिळालेली नाही. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.