
no images were found
नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट !
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.