Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागामध्ये महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन

शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागामध्ये महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन

0 second read
0
0
148

no images were found

शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागामध्ये महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन

दिल्ली येथील सुप्रसिद्ध कादंबरीकार व पत्रकार प्रदीप सौरभ हे शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामध्ये विविध उपक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील व्यासंगाचा विद्यार्थी, संशोधक,प्राध्यापक, परिसरातील साहित्य प्रेमी, पत्रकार व हिंदी प्रेमी यांना लाभदायी ठरणारे आयोजन हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन उपक्रमांचे नियोजन केलेले आहे.

  1. लेखक से परिचय, 2. मेरी रचना प्रक्रिया, 3. लेखक का साक्षात्कार

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ हिंदी समीक्षक व हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रो. ( डॉ.) अर्जुन चव्हाण हे असून ते प्रदीप सौरभ यांच्या साहित्य प्रवासाची मांडणी करणार आहेत. सदर उपक्रमात प्रदीप सौरभ यांच्या साहित्यावर शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये पीएच.डी. करीत असलेल्या अंध संशोधक विद्यार्थिनी रतन गुरव यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये त्यांची रचना प्रक्रिया, पत्रकारितेतील अनुभव आणि भावी लेखणासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे हिंदी विभागाचे प्रभारी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) ए. एम. सरवदे यांनी आवाहन केले आहे. स्थान: हिंदी विभाग, दिनांक: 08/10/2022, वेळ संध्या. 04:00 ते  05:30.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

EMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजी

EMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजी…