Home क्राईम सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात

सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात

1 second read
0
0
48

no images were found

सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर (वय 55, सहाय्यक लेखाधिकारी, पंचायत समिती, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, रा. प्लॉट नं. 6 व 7, मनोरमानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.

पन्हाळा पंचायत समितीतील घटना 

तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील रस्त्याचे तीन लाखाचे काम केले आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील मौजे आरळे येथील आरसीसी गटरचे तीन लाखाचे काम केले आहे. तक्रारदाराने या दोन्ही कामाच्या बिलाची फाईल व रक्कम मिळवण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. समितीतील सहाय्यक लेखा अधिकारी अरुण मांगलेकर यांनी विना त्रुटी दोन्ही फाईल कार्यवाहीसाठी पाठवण्यास तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार नंतर तक्रारदाराने 4 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आज सहाय्यक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांना पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयात तीन हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात पकडले.

पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ शरद पोरे, पो.ना. सुनील घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने, मयूर देसाई, हे.कॉ. विष्णू गुरव कारवाईत भाग घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…