
no images were found
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ८० सीसीटीव्ही बसवले
कोल्हापूर : गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स (जीएसएस) गोदरेज अँड बॉयसचे व्यावसायिक युनिट, गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने नुकतेच ‘’डिकोडिंग सेफ अँड साउंड – इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ (भारतीय संदर्भांत सुरक्षितता उलगडताना) हे सर्वेक्षण लाँच केले असून त्यामध्ये भारतीयांचा सुरक्षितता सुविधांकडे पाहाण्याची मानसिकता स्पष्ट करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार ४२ टक्के नागरिक ‘सेफ अँड साउंड’ ही संकल्पना स्वतःच्या आणि प्रियजनांच्या आरोग्याबाबत लागू करतात.
या संकल्पनेशी सुसंगत राहात आणि सुरक्षेचे मूल्य जपत ब्रँडने यावर्षी महत्त्वाच्या सुरक्षा व्यवस्था कायम राखण्यात प्रमुख भूमिका बजावण्यासाठी कंपनीने देशातील सर्वात शुभ आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ८० सीसीटीव्ही बसवले.