no images were found
‘नमो रमो नवरात्री’ मुळे अनोखी ऊर्जा वातावरणात निर्माण झाली- ना. रविंद्र चव्हाण
कोल्हापूर (प्रतिनिधि )-गरबा प्रेमींना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरणात गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देण्यात आले आहे.संपूर्ण डोंबिवली परिसरात नमो रमो गरबामुळे एक अनोखी ऊर्जा वातावरणात निर्माण झाली आहे. , अशी माहिती आमदार व मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. पण गेली काही वर्ष मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून ‘नमो रमो नवरात्री’ या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नमो रमो नवरात्री’चे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे. या नवरात्री उत्सवात कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील गरबा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत उत्साहात सहभागी होत आहेत. यंदा या उत्सवात गरबा क्वीन गीताबेन रबारी आपल्या सुरांनी दररोज रंगत आणत आहेत. सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी आणि केतन पटेल यांची देखील त्यांना साथ लाभत आहे.