no images were found
शिवाजी गजानन बसुगडे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु.एक लाखांची मदत
कोल्हापूर : माजी नगरसेवक श्री.संभाजी बसुगडे यांचे बंधू श्री.शिवाजी गजानन बसुगडे यांचे हृदय विकारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु.एक लाख इतके वैद्यकीय आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी विशेष पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर आर्थिक मदत पत्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे हस्ते माजी नगरसेवक श्री.संभाजी बसुगडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मा.नगरसेवक संभाजी बसुगडे यांनी पुष्पगुच्छ देवून श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाचे सर्वसमावेशक काम सुरु असून, नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारीही शासन तितक्याच क्षमतेने पेलवत आहे. गोर-गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील कोणी व्यक्ती गंभीर विकारांनी ग्रस्त झाल्यास त्यांच्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च संपूर्ण कुटुंबाला आर्थिक विवंचनेत अडकवतो. त्यातून त्या कुटुंबाला दिलासा देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या वैद्यकीय मदतीबाबत विशेष सकारात्मक भूमिका ठेवली आहे. गेल्या काही महिन्यातच कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत राज्यभरातील नागरिकांना करण्यात आली आहे. वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या रुग्णांनी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आर्दाळ येथील तानाजी जयराम आजगेकर यांच्या उपचारासाठी मंजूर रु.१ लाख, प्रयाग चिखली येथील सौ.प्रियांका दत्तात्रय कांबळे यांच्या नवजात शिशुवरील उपचारासाठी मंजूर रु.५० हजार, सांगली येथील कु.अमसिद्धी चिदानंद सबई यांचे उपचारासाठी मंजूर रु.६५ हजार, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी यांचेमार्फत मंगळवार पेठ येथील सौ.प्रियांका कुणाल शिंदे यांच्या नवजात जुळ्या शिशूंच्या उपचारासाठी मंजूर रु.५० हजार, बोरगांव येथील विनोद शिवाजी सावंत यांचे उपचारासाठी मंजूर रु.२५ हजार इतक्या मदतीचे धनादेशाचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मा.नगरसेवक शिवाजी बसुगडे, अमर बसुगडे आदी रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.