Home मनोरंजन घरचांच्या विरोधात जाऊन अर्जुन आणि रेवथी करणार लग्न.

घरचांच्या विरोधात जाऊन अर्जुन आणि रेवथी करणार लग्न.

3 second read
0
0
122

no images were found

घरचांच्या विरोधात जाऊन अर्जुन आणि रेवथी करणार लग्न.

कोल्हापूर, : सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी,
अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाज सुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे. भद्राक्काने रेवथीचे लग्न कार्तिकशी जुळवले आहे.

       आता मालिकेत कार्तिक आणि रेवथी यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. रेवथीच्या मनाविरुद्ध हे लग्न केले जात आहे पण अर्जुनाचा जीव वाचविण्यासाठी तिने या लग्नाला होकार दिला आहे. अर्जुन आतागप्प बसेल की रेवथीच्या प्रेमासाठी तो काही धडपड करेल, हे आता पाहायला मिळेल. तात्यांचा विरोधात जाऊन अर्जुन हे लग्न कसे करेल. अर्जुनची आई आणि रेवथीची आई त्या दोघांना मदत करतील का ? आणि अर्जुन आणि रेवथी यांचे लग्न होईल का, हे आपल्याला आता मालिकेत दिसेल. या सगळ्यात
कार्तिकची प्रतिक्रिया काय असेल आणि अर्जुन-रेवथीचे लग्न झाले आहे, हे समजल्यावर तो काय करेल, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांचे लग्न कशा प्रकारे होईल, हे पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या प्रेमकहाणीमध्ये पुढे काय वळणे येतील हे पाहायला विसरू नका ‘जिवाची होतिया काहिली’,

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …