no images were found
महिला समानता दिनानिमित्त महिला नवमतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : महिला समानता दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये महिला नव मतदार नोंदणी शिबिर व महिलांसाठी निवडणूक साक्षरतेबाबत कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात ‘महिलांचे निवडणुक प्रक्रियेतील महत्त्व व योगदान’ याविषयी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी माहिती दिली. महिला समानता दिना निमित्ताने सायबर कॉलेज, राजाराम कॉलेज, केएमसी कॉलेज, महावीर कॉलेज तसेच शहाजी लॉ कॉलेज येथे नुकतेच महिला नव मतदार नोंदणी शिबिर घेण्यात आले.
या वेळी शिवाजी विद्यपीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक तानाजी चौगुले उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.प्रवीण चौगुले यांनी केले. कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन कमला कॉलेजच्या नोडल अधिकारी वर्षा साठे यांनी केले. उपजिल्हाधिकारी श्री. शेंडगे यांनी सायबर कॉलेजला भेट दिली. यावेळी साफ चे संस्थापक स्वप्नील पवार व डिस्ट्रिक्ट कमिटी समन्वयक सार्थक कोळेकर, करण देसाई, यशोलेखा देसाई, प्राजक्ता भानुसे, सिया शेटे आणि दिव्या काकडे उपस्थित होते.