Home Uncategorized झूम फोन आता भारतातही उपलब्ध

झूम फोन आता भारतातही उपलब्ध

2 second read
0
0
25

no images were found

झूम फोन आता भारतातही उपलब्ध

 

भारत  : ‘झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स, इंक.’ने (एनएएसडीएक्यू : झेडएम) आज भारतातील उद्योग क्षेत्रातील आघाडीचा ‘झूम फोन’ लॉन्च केल्याची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलमध्ये (पुणे) मूळ भारतीय फोन नंबरसह ही झूम फोन सेवा आता उपलब्ध होणार आहे. झूम फोन बहुराष्ट्रीय संस्थांना (एमएनसीज्) देशांतर्गत उपस्थिती, स्वदेशी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये अतुलनीय सुलभता आणि आधुनिक कार्यक्षमता आणण्यास मदत करते. तसेच ५० देश आणि केंद्रशासित प्रदेशांशी जागतिक व्याप्तीही मिळवून देते.

 झूम फोनची मूळ फोन नंबर सेवा महाराष्ट्र दूरसंचार मंडळ (पुणे), त्यानंतर कर्नाटक (बंगळुरू), तामिळनाडू (चेन्नई), आंध्र प्रदेश (हैदराबाद), मुंबई आणि दिल्ली दूरसंचार मंडळासह (टेलिकॉम सर्कल) उपलब्ध असेल, ज्यामध्ये भारतातील सर्व प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांचा समावेश आहे. ‘झूम इंडिया’ला एप्रिल २०२३ मध्ये भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून (डीओटा) पूर्ण भारतातील एकत्रित परवाना आणि दूर अंतराचे परवानेही मिळाले. त्यानंतर ‘झूम इंडिया’ने भारतात झूम फोनसाठी देशांतर्गत पायाभूत सुविधा स्थापन करण्यावर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले. भारतासाठी स्थानिक फोन नंबर्ससह प्रथमच परवानाकृत क्लाउड ‘प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज’ (पीबीएक्स) सेवा सुरू करण्याचे हे प्रयत्न ‘झूम’ला या क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम करते.

‘झूमची क्लाउड पीबीएक्स सेवा भारताच्या एकत्रित दूरसंचार परवान्याच्या आवश्यकता पूर्ण करते. त्यासाठी नियामक आवश्यकतांनुसार समर्पित स्थानिक अंतर्जोडणीतील पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे झूम फोनचे हे पाऊल आमच्या ग्राहकांना हवी असलेली विश्वासार्ह सेवा आणण्यासाठीची वचनबद्धता दर्शवते,’ असे झूमचे उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष वेलचामी शंकरलिंगम म्हणाले. ‘जागतिक स्तरावर झूम फोनने सतत विस्तारावर भर दिला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५च्या पहिल्या तिमाहीत एक लाखाहून अधिक ठिकाणी पाच झूम फोन असलेले ग्राहक एकत्र केले. झूमवरील कर्मचारी आणि ग्राहक अनुभव प्रक्रियेसाठीचा विश्वास संपादित केला. आमची नवीन ऑफर जागतिक स्तरावर अखंड क्लाउड सेवा वितरीत करण्यात झूमचे नेतृत्व सिद्ध करते. भारतासह प्रत्येक बाजारपेठेत अनुपालन आणि सेवा उत्कृष्टता वाढवण्यास मदत करण्यासाठी स्थानिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देते’, असेही शंकरलिंगम म्हणाले.

झूम फोन विश्वासार्ह, सुरक्षित आणि लवचिक आवाजी संवाद वैशिष्ट्ये प्रदान करते, जे ‘झूम वर्कप्लेस’सह अखंड पद्धतीने एकत्रित करण्यात आले आहे. ‘झूम वर्कप्लेस’ हे ‘झूम एआय’सह कंपनीचे खुले सहयोग व्यासपीठ आहे. झूम फोन स्थानिक दूरसंचार सेवाही पुरवते आणि झूमच्या विद्यमान सशुल्क ग्राहकांसाठीही ही सेवा उपलब्ध आहे. पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्कद्वारे (पीएसटीएन – नागरिकांसाठीचे दूरसंचार जाळे) देशांतर्गत किंवा परदेशी कॉलिंगसह, व्यावसायिक ग्राहक त्यांची विद्यमान ‘पीबीएक्स’ सेवा बदलून त्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी आवश्यक संवाद प्रणाली एकाच ठिकाणी जोडू शकतात.

‘आम्ही झूम फोन भारतात आणण्यास उत्सुक आहोत, आणि त्यातही प्रथम तो महाराष्ट्र दूरसंचार मंडळात (पुणे) आणत आहोत. तसेच गतिमान कार्यशैलीसाठी, कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी बहुराष्ट्रीय उद्योगांना आणि सर्व प्रकारच्या स्वदेशी कंपन्यांचे सक्षमीकरण करण्यासही उत्सुक आहोत,’ असे ‘झूम’च्या भारत आणि सार्क प्रदेशाचे सरव्यवस्थापक आणि प्रमुख समीर राजे यांनी सांगितले. झूम फोन लाँच करणे हे झूमच्या भारतीय बाजारपेठेतील वचनबद्धतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे यश अमर्याद पद्धतीने मानवी संवादाला सामर्थ्य देणारे आणि आमच्या ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या व्यावसायिक समस्यांचे निराकरण करणारे विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समर्पणाचे प्रतिनिधित्व करते,’ असेही ते म्हणाले.

सर्वसमावेशक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त झूम फोनला कॉल उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षमतांसह चालना देण्यात आली आहे. वापरकर्ते नोंदी ठेवण्याऐवजी संभाषणांवर लक्ष केंद्रित करून कॉलनंतरचे सारांश मिळवण्यासाठी विनंती करू शकतात. व्हॉईसमेल प्राधान्याने तत्काळ संदेश देतात, त्यांना कायम अग्रस्थानी ठेवतात. तर ‘व्हॉइसमेल टास्क एक्स्ट्रॅक्शन’ व्हॉइसमेलमधून कार्ये वितरीत करते. त्यामुळे वापरकर्त्यांना प्रत्येक संदेश न ऐकताही पुढील टप्पा समजण्यास मदत होते. झूम फोनने अग्रगण्य व्यावसायिक संस्था, संपर्क केंद्र भागीदार आणि हार्डवेअर प्रदात्यांबरोबर सहयोग केला असून, ज्यामुळे देशांतर्गत उपस्थिती आणि सर्व आकारांच्या व्यवसायांसह बहुराष्ट्रीय संस्थांसाठी सर्व प्रकारच्या सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले व्यासपीठ तयार झाले आहे.

‘झूम फोनची उपलब्धता ही अत्यंत वेळेत झाली असून, जी भारतातील एक दूरसंचार सेवा म्हणून एकत्रित संवादाच्या मागणीचा कल दर्शवते. व्यावसायिक वैशिष्ट्यांसह एकच व्यासपीठ उपलब्ध करून, झूम फोन भारतातील स्थानिक कंपन्या आणि जागतिक व्यवसायांच्या वाढत्या आधुनिक सहकार्याच्या गरजांना संबोधित करते. जे कर्मचारी आणि ग्राहक संवाद माध्यमाला एक भक्कम पाया देण्याचा प्रयत्न करतात,’ असे फ्रॉस्ट अँड सुलिव्हन’चे ज्येष्ठ उद्योग संचालक कृष्णा बैद्य म्हणाले. त्याचबरोबर एका व्यासपीठावरील संवाद प्रणाली सुव्यवस्थित करण्याव्यतिरिक्त झूम फोन त्यांची मापनीयता, सुरक्षितता वाढवते, असेही त्यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…