Home स्पोर्ट्स चेन्‍नईमध्‍ये भारतातील पहिल्‍या नाइट स्‍ट्रीट रेसचे आयोजन

चेन्‍नईमध्‍ये भारतातील पहिल्‍या नाइट स्‍ट्रीट रेसचे आयोजन

2 min read
0
0
35

no images were found

चेन्‍नईमध्‍ये भारतातील पहिल्‍या नाइट स्‍ट्रीट रेसचे आयोजन

चेन्‍नई, : मोबिल या ऑटोमोटिव्‍ह ल्‍युब्रिकण्‍ट्समधील अग्रणी कंपनीने ३१ ऑगस्‍ट आणि १ सप्‍टेंबर रोजी चेन्‍नई फॉर्म्‍युला रेसिंग सर्किट येथे ‘इंडियन रेसिंग फेस्टिवल २०२४’दरम्‍यान चेन्‍नईमध्‍ये भारतातील पहिल्‍या नाइट स्‍ट्रीट रेससाठी रेसिंग प्रमोशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड (आरपीपीएल) सोबत सहयोग केला. या उल्‍लेखनीय इव्‍हेण्‍टसह मोबिलने सलग तिसऱ्या वर्षी इंडियन रेसिंग फेस्टिवलसोबत सहयोग केला, ज्‍यामधून गती, कौशल्‍य, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेचे भव्‍य संयोजन दिसून येते.इंडियन रेसिंग लीग आणि फॉर्म्‍युला ४ चॅम्पियनशीपसाठी ऑफिशियल ल्‍युब्रिकण्‍ट पार्टनर असलेल्‍या मोबिल ने भारतीय मोटरस्‍पोर्ट्सला प्रगत करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेला दाखवले, जेथे कंपनीचे ‘परफॉर्मन्‍स बाय मोबिल १’वर लक्ष केंद्रित आहे. आरपीपीएलद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या फेस्टिवलअंतर्गत संपूर्ण नोव्‍हेंबर २०२४ महिन्‍यामध्‍ये देशभरात पाच आकर्षक फेऱ्यांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या इव्‍हेण्‍टने मोबिल १ च्‍या भारतातील ५० वर्षांच्‍या उपस्थितीला देखील साजरे केले.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विपीन राणाम्‍हणाले, “आम्‍हाला इंडिया रेसिंग वीकचा भाग असल्याने सन्‍माननीय वाटत आहे. ही इव्‍हेण्‍ट जागतिक मोटरस्‍पोर्ट्स प्रगत करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला दाखवते, तसेच भारतातील रेसिंगच्‍या भविष्‍याला गती देखील देते. गेल्‍या तीन वर्षामध्‍ये आम्‍ही मोबिल उत्‍पादनांमधून देण्‍यात आलेल्‍या आत्‍मविश्‍वासासह रेसर्स व उत्‍साहींना त्‍यांच्‍या क्षमता अनलॉक करण्‍यास सक्षम केले आहे.”

आरपीपीएलचे अध्‍यक्ष श्री. अखिलेश रेड्डीम्‍हणाले, “आम्‍हाला मोबिल सोबत या सहयोगाचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे, तसेच भारतातील पहिल्‍या नाइट स्‍ट्रीट रेसला प्रत्‍यक्षात आणण्‍याचा आनंद होत आहे. नाइट रेसिंगचा उत्‍साह व ऊर्जेने फेस्टिवला नवीन आकार दिला आहे, ज्‍यामधून आमच्‍या रेसर्सचे टॅलेंट व आवड दिसून येते. एफ४ आणि आयआरएलच्‍या सर्व टीम्‍सचे त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन आणि आम्‍ही भविष्‍यात हीच गती कायम राखण्‍यास उत्‍सुक आहोत.”या फेस्टिवलला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला, जेथे सेलिब्रिटी टीमचे मालक जसे बॉलिवुड सितारे जॉन अब्राहम व अर्जुन कपूर, क्रिकेट लीजेण्‍ड सौरव गांगुली आणि अभिनेता नागा चैतन्‍य यांनी या फेस्टिवलच्‍या उच्‍च दर्जाप्रती योगदान दिले. भव्‍य पुरस्‍कार सोहळ्यासह इव्‍हेण्‍टची सांगता झाली. या पुरस्‍कार सोहळ्यामध्‍ये विजेत्‍या टीम्‍स व व्‍यक्‍तींच्‍या अपवादात्‍मक कामगिरींना गौरविण्‍यात आले, ज्‍यामुळे भारतात मोटरस्‍पोर्टच्‍या भविष्‍याला गती देण्‍यामध्‍ये मोबिल १ ची भूमिका अधिक दृढ झाली आहे.

.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…