
no images were found
अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जमीन मंजूर
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर उच्चा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्चा न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे.
ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नाही. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख यांनी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून ते नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात होते.