
no images were found
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं दिवाळीसाठी पॅकेज जाहीर
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना कमी दरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.