Home क्राईम जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला अटक

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला अटक

3 second read
0
0
91

no images were found

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला अटक

जम्मू :  जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया  यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या यासिरला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री उशिरा 11.45 च्या सुमारास हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद  याचं नाव समोर आलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या 6 महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता.

दरम्यान, लोहियांच्या हत्येप्रकरणी आरोपी यासिरला कानाचक परिसरातून आज अटक करण्यात आली. पोलीस लवकरच या प्रकरणाची माहिती शेअर करणार आहेत. आरोपी यासिर हा पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करायचा आणि या घटनेपासून तो बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरीही जप्त केल्याचं बोललं जात आहे.लोहिया काही दिवसांपासून मित्राच्या घरी राहत होते. आरोपी हा आक्रमक आणि अस्थिर व्यक्ती असल्याची माहितीही त्यांनी दिली. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट  नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर या संघटनेचं नाव समोर आलं. याआधीही या संघटनेनं अनेकदा व्हिडिओ जारी करून धमक्या दिल्या आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनेचं नाव आलं होतं. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.

आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांना दोन महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या तुरूंग विभागाचे नवीन महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. ते शहराच्या बाहेर उदयवाला इथं राहत होते. हेमंत लोहिया यांच्या हत्येनं पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण, ही हत्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यापूर्वी झाली आहे. त्यामुळंच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …