
no images were found
उदगीरजवळ भीषण अपघातात पाच जण जागीच ठार
उदगीर : (शहाजहान आत्तार) उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला या अपघातात स्वीफ्ट डिझायर कारमधील अलोक तानाजी खेडकर,अमोल जीवनराव देवकत्ते,कोमल व्यंकट कोदरे,यशोमती जयवंत देशमुख,नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार कारमधील पाच जण जागीच ठार झाले. तर प्रियंका गजानन बनसोडे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
या बसमध्ये एकूण ४५ प्रवाशी होते त्यातील पंधरा प्रवाशांना कीरकोळ मार लागला असुन बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पुढील उपचार सुरु आहे . दरम्यान कारमधील मयत पाच जण हे उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलीसांना मिळताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक भोळ पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले पोलीस कर्मचारी तुळशीराम बरुरे सचिन नाडागुडे राम बनसोडे राहुल गायकवाड आदिजणांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केला.