no images were found
इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीमुळे चिमुकल्याचा बळी
वसई : पेट्रोलला पर्याय म्हणून भारताने मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणल्या आहेत. परंतु आत्तापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या असंख्य घटना घडतच आहेत. आणखी महत्वाचे असे कि शक्यतो उन्हाळ्यात चालत्या गाड्यांनी पेट घेतल्याचे प्रकार जास्त आढळले. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलेले होते. वसईमध्ये काल एका लहान मुलाचा इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीने बळी घेतला आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग लावलेली असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाला. त्यामध्ये सात वर्षाचा चिमुकला 70 ते 80 टक्के भाजला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
वसईपुर्व येथील रामदासनगरमध्ये ही घटना घडली आहे. 23 सप्टेंबरच्या रात्री चिमुकल्याच्या वडिलांनी शाहनवाज अन्सारी यांनी घराच्या हॉलमध्ये गाडीची बॅटरी चार्जिंगला लावली होती. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारात त्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला.
त्यावेळी हॉलमध्ये झोपलेला शब्बीर आणि त्याची आई त्या दुर्घनेमध्ये भाजली. शब्बीर अधिक अधिक भाजला असल्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शब्बीर शाहनवाज अन्सारी असे या चिमुकल्या मुलाचं नाव आहे. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.