Home क्राईम शुक्रवार पेठेतील महिलेचा पाडळीत खून ?

शुक्रवार पेठेतील महिलेचा पाडळीत खून ?

0 second read
0
0
76

no images were found

शुक्रवार पेठेतील महिलेचा पाडळीत खून ?

कोल्हापूर :  पाडळी खुर्द येथील बालिंगा ते शिरोली दुमाला रस्त्यावर एका शेतात शुक्रवार पेठ परिसरातील आरती आनंद सामंत (वय ४५, रा. जैनमठ गल्ली) या महिलेच्या झालेल्या खुनाचे रहस्य उलघडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्तधनाच्या लालसेतून हा खून झाला असून याप्रकरणी एका मांत्रिकाला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. नामदेव शामराव पोवार ( ३५ रा. जोगेवादी, राधानगरी) असे या मांत्रिकाचे नाव आहे.

आरती आनंद सामंत यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळून आला होता.  हा खुनाचा प्रकार आहे. घटनास्थळाजवळ  महिलेची मोपेडही आढळून आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. शेतात मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर शेतातील बंधारा लगत 45 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना काल सकाळी आढळून आला.

पोलीस पाटील यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या आयडीकार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली असून आरती अनंत सामंत असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बालिंगा शिरोली दुमाला रस्त्यावर महिलेची मोपेडही आढळून आली आहे. या मोपेडपासून पाचशे मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह बंधाऱ्यालगत पडलेला होता. डोक्याच्या मागील बाजूला खोलवर जखम झाली असून त्यातून रक्तस्त्राव सुरू होता. याशिवाय हातालाही खरचटल्याचे व्रण दिसून येत होते. महिलेच्या अंगावरील तसेच गळ्यातील दागिनेही लंपास करण्यात आले होते. यावरून हत्या करणारा संशयित आरोपी हा आरती आनंद सामंत यांच्या ओळखीचा असावा असा पोलिसांना संशय आला. आरती सामंत यांच्या मोबाईलचे डिटेल मिळविले असता नामदेव पोवार याच्याशी त्याचे अनेकवेळा संभाषण झाल्याचे उघडकीस आले त्यावरून पोलीसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आरती सामंत यांना आपल्या घरात गुप्तधन असल्याचे स्वप्न पडत असे. ते काढण्यासाठी त्यांनी नामदेव पोवारशी संपर्क साधला होता. नामदेव पोवार हा कर्जबाजारी होता. आरती  सामंत यांचा खून करून त्यांचे दागिने काढून घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…