no images were found
हिंदू धर्मीयांची एकजूट अभेद्य राहील : राजेश क्षीरसागर हिंदू धर्मीयांची एकजूट अभेद्य राहील : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी):-हिंदू धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा आहे हिंदू धर्म आहे. गेल्या काही वर्षात लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्यापारीकरण आदी माध्यमातून धर्मांधांनी हिंदू धर्मियांच्या विरोधात अजेंडा निर्माण केला आहे. परंतु, विविध संघटनांमध्ये विखुरलेले हिंदू धर्मीय एकजूट झाले असल्याचे हिंदू धर्म परिषदेवरून सिद्ध झाले. हिंदू धर्मीयांची ही एकजूट अभेद्य राहील, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
सकल हिंदू समाजाच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले (बाबा) यांची निवड करण्यात आली. उदंड प्रतिसादात पार पडलेल्या हिंदू धर्म परिषदेच्या नेटक्या नियोजनाबद्दल आयोजकांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्या अध्यक्ष पदी झालेल्या निवडीबद्दल उदय भोसले (बाबा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर ही क्रांतीची भूमी आहे. या ठिकाणी होणाऱ्या उपक्रमांचे लोण संपर्ण देशभरात पसरते. हिंदू धर्मियांच्या एकजूटीसाठी सुमारे १० वर्षापूर्वी सुरु केलेला श्रावण व्रतवैकल्य उपक्रम आज देशभरात आयोजिला जातो हे याचे उत्तम उदाहरण आहे. हिंदू धर्मियांनी कधीही कुणाची कळ काढली नाही. पण अंगावर आला कि शिंगावर घेवून सडेतोड उत्तर देण्याची ताकतही हिंदू धर्मियांमध्ये आहे. बांगलादेश मधील हिंदू धर्मियांवर होणारे अत्याचार, लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्यापारीकरण, वोट बँक अशा घटनांचा सारासार विचार करता हिंदू धर्मीयांची एकजूट होणेच यासर्वाला एकमात्र उत्तर होय. त्याचमुळे सर्व हेवेदावे बाजूला ठेवून कोल्हापुरातील हिंदू समाज एकवटला असून, त्याचे नेतृत्व जेष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने प्रखर हिंदुत्ववादी करत आहे. आगामी काळात राज्यभर व देशभर अशाच पद्धतीने धर्म परिषदांचे आयोजन करण्यात येईल आणि अखंड हिंदुस्थानातील हिंदू धर्मियांची वज्रमुठ तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उदय भोसले, गजानन तोडकर, उदय घोरपडे, शिवाजी जाधव, स्वप्नील पार्टे, किशोर घाटगे, निरंजन शिंदे, संभाजी भोकरे, अर्जुन आंबी, सुनील सामंत, बाबासाहेब भोपळे, अभिजित पाटील, योगेश कानतानी, शिवानंद स्वामी, प्रसन्न शिंदे, योगेश केरकर, अनिल दिंडे, आशिष लोखंडे, व्यंकटेश कोमटे, अवधूत चौगुले, सुभाष भोसले, अमेय भालकर, उदय लाड, सुहास चव्हाण आदी उपस्थित होते.