Home औद्योगिक डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील १२ विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १८ लाख पॅकेजवरती निवड

डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील १२ विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १८ लाख पॅकेजवरती निवड

18 second read
0
0
24

no images were found

डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील १२ विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १८ लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी ( प्रतिनिधी ):-येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाईल विभागातील बारा विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय ट्रायडेंट या नामांकित कंपनीमध्ये रु. १८ लाख इतक्या भरघोस पॅकेजवरती निवड झाली आहे तसेच तृतीय वर्षात शिक्षण घेत असणा-या सहा विद्यार्थ्यांना ट्रायडेंटकडून दोन महिन्याच्या प्रशिक्षणाबरोबर रुपये एक लाख इतके विद्यावेतनावर असे एकूण १८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

          गुणवत्तापूर्ण उत्पन्नामुळे ट्रायडेंट ही संस्था प्रसिध्द आहे, ही कंपनी टेरी टॉवेल व शिटींग फॅबरीक उत्पादन करते. ट्रायडेंट ग्रुपने विद्यार्थ्यांची निवड केवळ संस्था व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर यांच्या शिफारसीवर  १८ लाख पॅकेजवरती केली आहे. धनश्री रसाळ, सोनाली मगदूम, किरण हळवणकर, राहुल किर्ती, विवेक मंगसुळे, मोहसिनअहमद आगा, संयक्ता पराशर, सिध्दांतकुमार गंगाई, धनश्री कदम, के. प्रविणराज, अभिषेक कुणके व श्रुती उपाध्ये यांची निवड केली आहे.  

तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील सलोनी पाटील, ओंकार घाडगे, दामोदर लठठे, सुंदराम कामाक्षी, अनिरुध्द जाधव, मिताली चिखले या विद्यार्थ्यांची रुपये १ लाख इतक्या विद्यावेतनावर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. ट्रायडेंटमध्ये डीकेटीईचे तृतीय वर्षातील विद्यार्थी संशोधक प्रकल्पावर काम करीत असून कंपनीच्या वतीने विविध विभागातील तज्ञ सदर विद्यार्थ्यांना या काळात मार्गदर्शन मिळत आहे. याशिवाय प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील संशोधन वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट पुढीलवर्षी म्हणजेच २०२४-२५ साली नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत.

        उत्तम कौशल्य व ज्ञान अवगत असणारा इंजिनिअर ही या काळाची गरज आहे. वस्त्रोद्योग अभियंत्यांना ज्या उद्योगजगतात काम करायचे आहे त्याची ओळख व्हावी व मुलाखात देत असताना त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन महिने या कालावधीसाठी देश व विदेशातील विविध उद्योगजगतात ट्रेनिंगसाठी पाठवले जाते.

सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकिवाटे याचे मार्गदर्शन लाभले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…