no images were found
” बादल पे पाँव है” मालिकेमध्ये बानीने केली शेअर बाजारात गुप्तपणे गुंतवणूक; खन्ना कुटुंबात खळबळ
सोनी सब या वाहिनीवर सुरू असलेली ‘बादल पे पाँव है’ ही मालिका बानी या जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. तिच्यावर खूप आर्थिक मर्यादा असतानाही ती सर्वाचे कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी धडपड करते. गेल्या काही भागात बानी (अमनदीप सिद्धू) च्या गुप्त शेअर बाजारातील गुंतवणुकीचा खुलासा तिचा पती रजत (आकाश आहुजा) याने संपूर्ण खन्ना कुटुंबासमोर केला आहे. सासरच्या लोकांचा खूप विरोध असताना देखील तिने गुंतवणूक केली आहे. यामुळे संतप्त होऊन तिचे सासरे बिशन (सूरज थापर) रागाने सर्वांसमोर सांगतात की, जर बानी खन्ना ही घरातील नियम पाळू शकत नसेल तर तिला यापुढे घरात राहण्याचा अधिकार नाही.
आगामी भागांमध्ये रजत आणि बानी यांच्यात खूप दुरावा निर्माण होणार आहे. रजतने बानीवर खोटे बोलून विश्वास गमावल्याचा आरोप केला. यावर बानी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की, तिच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीचा उद्देश केवळ कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि राहणीमान सुधारणे हाच आहे. जोखमीच्या किंवा बेकायदेशीर कामात अडकण्याचा आपला कोणताही हेतू नाही, असे तिने सांगितल्यानंतरही तिला कुटुंबाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. बानीची सासू पूनम (शेफाली राणा) तिला साथ देते, पण रजत आणि सासरे तिला कडाडून विरोध करतात. दरम्यान, लावण्या (भाविका चौधरी) रजतच्या बानीमध्ये दुरावा झाल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या जवळ जाण्याचा आटोकाट प्रयत्न करते. बानी शेअर बाजारातील तिचा प्रवास कसा सुरू करते. खूप आव्हाने असताना देखील त्यामध्ये तग धरून राहते. तसेच रजतशी असलेले तिचे नाते पुढे कसे सांभाळून ठेवते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
बानी अरोराची भूमिका साकारणारा अमनदीप सिद्धू म्हणाली, “बानीच्या गुप्त गुंतवणुकीचा खुलासा सर्वांसमोर झाल्याने या कथेला नाट्यमय वळण मिळाले आहे. खन्ना कुटुंबाला तिच्या शेअर ट्रेडिंगबद्दल काळजी का वाटते? हे तिला कळते आणि तिच्यासाठी पुढील कालखंड हा अतिशय अवघड असा आहे. रजतचा विश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा जिंकण्याचा प्रयत्न मी यापुढे करणार आहे, असेही तिने सांगितले. मालिकेमध्ये आपण पुढे असे पाहणार आहोत की, आता बानीला एका नवीन समस्येचा सामना करावा लागणार आहे, याची तिला जाणीव देखील नाही. आपल्या महत्वाकांक्षेमध्ये संतुलन राखून सर्वकाही तिला व्यवस्थित करावे लागेल.