no images were found
‘भीमा’मध्ये नीता मोहिंद्रा साकारत आहे कैलाशा बुआची भूमिका!
एण्ड टीव्हीवरीन नवीन मालिका ‘भीमा’चे लक्षवेधक कथानक आणि प्रतिभावान कलाकारांसाठी भरभरून कौतुक करण्यात येत आहे. मालिकेमध्ये कैलाशा बुआची नकारात्मक भूमिका साकारत असलेल्या नीता मोहिंद्रा यांचे इंडस्ट्री व चाहत्यांकडून खूप कौतुक करण्यात येत आहे. आपल्या भूमिकेबाबत सांगताना नीता मोहिंद्राम्हणाल्या, ”कैलाशा बुआ अत्यंत कडक आहे आणि तिची उपस्थिती लक्षवेधक आहे, जेथे कुटुंबामधील तिच्या अधिकाराबाबत कोणीच प्रश्न विचारत नाही. तिचा मुलगा कलिका सिंग तिचा खूप आदर करतो, तिची मूल्य व विश्वासांचे पालन करतो. तिला आवडणाऱ्या लोकांवर तिचा दृढ विश्वास आहे आणि त्यांच्याप्रती उदारवादी आहे. आदरणीय व प्रभावी दर्जा असताना देखील सामाजिक पदाप्रती तिची कटिबद्धता तिला प्रबळ नकारात्मक भूमिका बनवते.”
मालिकेसाठी चित्रीकरण सुरू असताना नीता मोहिंद्रा ही भूमिका साकारण्याच्या त्यांच्या अनुभवाबाबत सांगत आहेत. त्या म्हणाल्या, ”कैलाश बुआच्या भूमिकेसाठी तयारी करण्याकरिता मला सामाजिक पदांसाठी आसुसलेल्या महिलेच्या मानसिकतेमध्ये सामावून जावे लागले. मी कैलाशा बुआचा विश्वास आणि परिवर्तनाप्रती तिचा निर्धार जाणून घेण्यासाठी वेळात वेळ काढून त्या काळाच्या सांस्कृतिक व सामाजिक गतीशीलतेबाबत जाणून घेतले. नकारात्मक भूमिका साकारणे अत्यंत आव्हानात्मक असते, ज्यासाठी कृती व मूल्ये आधुनिक विचारसरणीशी जुळून जाणारी भूमिका आत्मसात करण्याची गरज असते. तरीदेखील, ही गुंतागुंती या भूमिकेला लक्षवेधक बनवते.” आपल्या सह-कलाकारांबाबत सांगताना नीता पुढे म्हणाल्या, ”मी दररोज सेटवर शूटिंगचा आनंद घेत आहे. संपूर्ण टीमसह कलाकार व क्रू अत्यंत सहाय्यक आहेत. त्यांची समर्पितता मला प्रत्येक सीनमध्ये उत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करते. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करताना मला माझ्या भूमिकेमध्ये सामावून जाण्यास, कैलाशा बुआला सादर करणारे तिचे उद्देश व गुंतागुंती शोधण्यास मदत होत आहे.”