Home Uncategorized कोलगेटने 2025 पर्यंत 2 लाख शालेय विद्यार्थ्यांना ओरल हेल्थ एजुकेशन देण्यासाठी गोवा सरकारसोबत भागीदारी केली

कोलगेटने 2025 पर्यंत 2 लाख शालेय विद्यार्थ्यांना ओरल हेल्थ एजुकेशन देण्यासाठी गोवा सरकारसोबत भागीदारी केली

10 second read
0
0
17

no images were found

कोलगेटने 2025 पर्यंत 2 लाख शालेय विद्यार्थ्यांना ओरल हेल्थ एजुकेशन देण्यासाठी गोवा सरकारसोबत भागीदारी केली

पणजी: कोलगेटचा ब्राइट स्माइल्स, ब्राइट फ्यूचर्स® (बीएसबीएफ) उपक्रम, संपूर्ण भारतातील मुलांमध्ये ओरल हेल्थ एजुकेशन वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. या उपक्रमांतर्गत, कोलगेटने गोवा सरकारसोबत भागीदारी केली आहे आणि 2025 पर्यंत राज्यातील सर्व 2 लाख शालेय विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या वर्षी, कोलगेटच्या ब्राइट स्माइल्स, ब्राइट फ्युचर्स® ने 8 भारतीय राज्यांमधील 10,000 पेक्षा जास्त शाळांमधील 52 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे.गेल्या आठवड्यात, कंपनीने राज्यभरातील मुलांना ओरल हेल्थ एजुकेशन देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत भागीदारी केली आणि कंपनीने 2 वर्षांत 50 लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे, गोवा सरकारसोबतच्या या नवीन सहकार्याने, कंपनी भारतातील प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलापर्यंत पोहोचण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आपला प्रमुख उपक्रम आणखी मजबूत करत आहे.

श्रीमती प्रभा नरसिंहन, एमडी आणि सीईओ, कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड यांच्यासह गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शारदा इंग्लिश हायस्कूल, मार्सेला, गोवा येथे आयोजित या कार्यक्रमात एनजीओ भागीदार भारतकेयर्स सोबत कार्यक्रमाची सुरुवात झाली.शुभारंभ समारंभात उपस्थितांना संबोधित करताना, गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ओरल हेल्थ हे एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की मौखिक काळजी घेण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत. कोलगेटच्या ब्राईट स्माइल्स, ब्राइट फ्युचर्स या उपक्रमात सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे आणि गोव्याला आरोग्यदायी बनवण्याच्या या संयुक्त प्रयत्नात एकत्र आल्याबद्दल श्रीमती प्रभा नरसिंहन, कोलगेट टीम आणि शाळा यांचे आभार मानू इच्छितो. 1992 पासून गोव्यात टूथपेस्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या उत्तम सेटअप आणि अनेक सामाजिक प्रभाव उपक्रम सुरू केल्याबद्दल मी कोलगेट टीमचे अभिनंदन करू इच्छितो.

या भागीदारीला संबोधित करताना, श्रीमती प्रभा नरसिंहन, एमडी आणि सीईओ, कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड पुढे म्हणाल्या, “आम्ही आमच्या विज्ञान-समर्थित उत्पादने आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे देशभरात ओरल केअर बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि भारताचे ओरल हेल्थ सुधारण्यासाठी आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत. गोवा हा भारतातील कोलगेटच्या कथेचा नेहमीच अविभाज्य भाग राहिला आहे, ज्याची सुरुवात 1992 मध्ये आमच्या टूथपेस्ट उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेपासून झाली. राज्यातील 2 लाख मुलांना ओरल हेल्थबद्दल शिक्षित करण्यासाठी गोवा राज्य सरकारसोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. 2025 पर्यंत राज्यातील 2 लाख मुलांना मौखिक आरोग्याविषयी शिक्षित करण्यासाठी गोवा राज्य सरकारसोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला अत्यंत सन्मान वाटतो. वेस्ट मॅनेजमेंट, महिलांसाठी डिजिटल आणि आर्थिक साक्षरता आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती या क्षेत्रातील आमच्या सुरु असलेल्या प्रयत्नांसोबतच, राज्यात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा विस्तार आहे.”

मौखिक काळजी घेण्याच्या योग्य सवयींवर लक्ष केंद्रित करणारा काळजीपूर्वक डिझाइन केलेला, कोलगेटचा ब्राईट स्माइल्स, ब्राइट फ्युचर्स®, उपक्रम, तंबाखू प्रतिबंधाविषयी जागरूकता निर्माण करते आणि 6 ते 15 वर्षे वयोगटातील शालेय मुलांमध्ये ओरल हेल्थसाठी चांगल्या पोषणाला प्रोत्साहन देते.

हा कार्यक्रम ब्रश करण्याची योग्य पद्धत, दिवसातून दोनदा ब्रश करण्याचे महत्त्व, दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलणे, तंबाखूचे सेवन टाळणे आणि पौष्टिक आहाराचे पर्याय स्वीकारणे या पाच महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. डेंटल किट, ब्रशिंग कॅलेंडर, शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शक आणि प्रमाणपत्रे यासह पूरक साहित्य मुलांना आणि शिक्षकांना जीवनभर आवश्यक ज्ञान देतील. 1976 मध्ये स्थापना झाल्यापासून, कोलगेट ब्राइट स्माइल्स, ब्राइट फ्युचर्स® उपक्रमाने भारतातील 176 दशलक्षाहून अधिक मुलांवर ओरल हेल्थच्या चांगल्या सवयींच्या ज्ञानाने सकारात्मक प्रभाव टाकला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…