Home सामाजिक जिल्ह्यातील 46 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2928 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 46 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2928 क्युसेक विसर्ग

23 second read
0
0
22

no images were found

जिल्ह्यातील 46 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 2928 क्युसेक विसर्ग

 

 कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला असून धरणाच्या विद्युत गृहातून 1500 व सांडव्यातून 1428 क्युसेक असा एकूण 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोकरे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – ऐनापूर व गिजवणे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, तुरुंबे व कसबा वाळवे, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणंगाव, खोची, शिगांव व दानोळी, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, वालोली व करंजफेण, कुंभी नदीवरील- कळे, तुळशी नदीवरील- बीड असे एकूण 46 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.32 टीएमसी, तुळशी 3.31 टीएमसी, वारणा 29.05 टीएमसी, दूधगंगा 21.83 टीएमसी, कासारी 2.36 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.57 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36 फूट, सुर्वे 36.10 फूट, रुई 69.3 फूट, इचलकरंजी 67.8 फूट, तेरवाड 63.6 फूट, शिरोळ 61.6 फूट, नृसिंहवाडी 61 फूट, राजापूर 50.9 फूट तर नजीकच्या सांगली  29 फूट व अंकली 36.7 फूट अशी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…