
no images were found
डीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी ( प्रतिनिधी ):- येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील बी.टेक व डिप्लोमा विभागात शिक्षण घेणा-या चौदा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत क्रिहान टेक्स मेक प्रा. लि. (रिड अँण्ड टेलर), बरुज व म्हैसुर कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी रिड अँण्ड टेलर लिमिटेड, बरुज व म्हैसुर येथे विविध पदांवर रुजू झालेले आहेत. रिड अँण्ड टेलर कंपनी ही डीकेटीई संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हूव मार्फत निवड करीत आहे.
क्रिहान टेक्स मेक प्रा. लि. (रिड अँण्ड टेलर) ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून कॉटन शर्टींग, व वर्स्टेड शुटींग मधील दर्जेदार फॅब्रिक बनविणारी कंपनी असून सदर कंपनी भारतातील वस्त्रोद्योग निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्हयुव आयोजित केला होता त्यामध्ये ग्रुप डिक्सशन व पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेवून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. रिड ऍण्ड टेलर लिमिटेड कंपनीमध्ये प्रितम पाखले, तेजस दाडमोडे, विवेक हुक्केरी, सुहास रेंदाळे, रोहित जोंग, अमोल बंडगर, विजय बिचकर, सौरभ शेळके, रुचिता म्हेतर, गौरव धारवट, विग्नेश डोंगळे, विनायक हल्लूर, प्रज्वल पुजारी व तृप्ती शिंदे या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे. शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात. या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे , उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.