Home Uncategorized ग्रे डिव्होर्स प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?

ग्रे डिव्होर्स प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?

1 second read
0
0
44

no images were found

ग्रे डिव्होर्स प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?

मुंबई : लग्न हा प्रत्येक संस्कृतीमधील एक पवित्र आणि महत्त्वाचा संस्कार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका व्रत देखील करतात. पण, दुर्दैवानं सर्वच विवाह जन्मोजन्मी सोडा एक जन्म देखील टिकत नाहीत. लग्नानंतर पती-पत्नीमधील मतभेद टोकाला गेल्यानंतर एकत्र राहून त्रास सहन केल्यापेक्षा ते जोडपं काडीमोड घेऊन एकमेकांपासून वेगळे होतात. लग्नानंतर काही वर्षांनीच घटस्फोट घेऊन हे जोडपं त्यांचं आयुष्य स्वतंत्रपणे सुरु करतात. या प्रकारच्या घटस्फोटापेक्षा ‘ग्रे डिव्होर्स’ हा वेगळा प्रकार आहे.
वयाची चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडल्यानंतर जोडपं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेऊन परस्परांना घटस्फोट देतात. घटस्फोटाचा हा प्रकार म्हणजे ग्रे डिव्होर्स. या प्रकारातल्या जोडप्यानं बराच काळ एकमेकांसोबत आयुष्य घालवलं असतं. संसारातील जबाबदाऱ्या एकत्र पूर्ण केल्या असतात. मुलांना एकत्र मोठं केलं असतं. त्यानंतर ते दोघं एकमेकांपासून वेगळं होण्याचा अवघड निर्णय घेतात.
हा शब्द प्रामुख्यानं ग्रे केसांशी संबंधित आहे. या वयातील व्यक्तींच्या सामान्यपणे हा केसांचा रंग असतो. त्या रंगापासून ‘ग्रे डिव्होर्स’ हा शब्द प्रचलित झाला आहे. अमेरिकेत 2004 साली हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला. त्यानंतर जगभर या प्रकारच्या घटस्फोटांचा ट्रेंड वाढत आहे. मुलं मोठी झाल्यानंतर शिक्षण, करिअर किंवा अन्य कारणांसाठी घर सोडून जातात त्यावेळी आपला समान उद्देश संपल्याची भावना जोडप्यामध्ये निर्माण होते. त्यामधून ते वेगळं होण्याचा विचार करु लागतात.
नवरा-बायकोमध्ये आर्थिक कारणांमुळे एकमत नसणे हे देखील तणावाचं एक कारण असू शकतं. अनेकदा त्यांच्यात आर्थिक कारणांमुळे मतभेद असतात. विशेषत: दोघांमधील एकच व्यक्ती कमावत असेल आणि तोच सर्व आर्थिक निर्णय घेत असेल तर नात्यामध्ये असंतुलन आणि नाराजी निर्माण होते. निवृत्तीनंतर जोडपी अधिक काळ एकत्र घालवतात. सतत एकत्र राहण्यानं त्यांच्यामधील मतभेद आणखी वाढतात. निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं? यावर त्यांच्यात सहमती होत नाही.
जोडीदारापैकी एकाचं विवाहबाह्य प्रेमप्रकरण असेल तर धोका दुसऱ्या व्यक्तीला सहन होत नाही. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात मुलं किंवा अन्य जबाबदारीमुळे या विषयावर समोरच्याला सुधारण्याची संधी दिली जाते. पण, वयाच्या या टप्प्यात सर्व मार्ग संपल्यानं घटस्फोट हाच पर्याय शिल्लक राहतो.
सध्याच्या काळात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीनं कमावत आहेत. योग्य प्रकारे अर्थार्जन करण्याची आणि स्वत:च्या तत्वांवर आयुष्य जगणं शक्य असेल तर महिला असमाधानकारक विवाहातून बाहेर पडण्याचा मार्ग स्विकारतात.आपला समाजात आता घटस्फोटाला मान्यता मिळू लागली आहे. सामाजिक दडपण कमी झाल्यानं आता जोडपी सहज घटस्फोट घेऊ लागली आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…