Home देश-विदेश अफगाणिस्तानी लोकं का करतात पाकिस्तानचा द्वेष

अफगाणिस्तानी लोकं का करतात पाकिस्तानचा द्वेष

0 second read
0
0
17

no images were found

अफगाणिस्तानी लोकं का करतात पाकिस्तानचा द्वेष

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रचंड द्वेष वाढला आहे. नुकताच जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या हातात अफगाणिस्तानचा ध्वज होता. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यांना तालिबान सरकार पाठिंबा देत असल्याचा आरोप ही पाकिस्तानने केलाय. अफगाणिस्तानातील लोक पाकिस्तानचा एवढा द्वेष करताय दुसरीकडे भारतासोबतचे त्यांचे संबंध सातत्याने घट्ट होत आहेत. पाकिस्तानातील तज्ज्ञांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
पाकिस्तानी तज्ञ कमर चीमा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या मागचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला. कमर चीमा यांनी वकील हमीद बेसानी यांच्याशी चर्चा केलीये. बेसानी म्हणाले की, तालिबानच्या पहिल्या राजवटीत पाकिस्तानने त्यांच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे पाकिस्तानबद्दल त्यांच्या मनात द्वेष वाढला आहे. तालिबानवर आधी पाकिस्तानचा खूप प्रभाव होता. पाकिस्तानच्या लोकांना अफगाणिस्तान हे आपलेच राज्य वाटायचे. पण अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर जेव्हा तालिबानने तेथून माघार घेतली आणि पाकिस्तानी पत्रकार काबूलला पोहोचले तेव्हा त्यांना पहिल्यांदाच अफगाण जनतेच्या द्वेषाला सामोरे जावे लागले होते.
बेसानी यांनी सांगितले की, परिस्थिती इतकी वाईट होती की, पाकिस्तानी पत्रकार भारतीय असल्याचं सोंग करत होते. अफगाणिस्तानसाठी भारताने नेहमीच मदत केल आहे. भारत तेथे धरणे बांधत आहे. भारत त्यांच्यासाठी सुख सुविधी निर्माण करत आहे. त्यामुळे भारत हा अफगाणिस्तानसाठी मित्र देश बनला आहे. तर पाकिस्तानला ते अडचणींना जबाबगदार असलेले देश मानत आहेत.
कमर चीमा यांनी सांगितले की, आता अमेरिकाही पाकिस्तानला दोष देत आहे. तालिबाननेही पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानी सेनापतींनी तालिबानची निर्मिती केली होती, जेणेकरून पाकिस्तानमधील पश्तून फुटीरतावाद दाबता येईल. त्यामुळे आता पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पाकिस्तान केवळ डॉलरच्या लालसेपोटी अफगाण लोकांना येथे ठेवत आहे आणि अफगाण लोकांनाही हे माहित आहे. पाकिस्तानचे नेते अफगाणिस्तानला दिलेल्या मदतीबद्दल वारंवार बोलून अफगाणी लोकांचा अपमान करतात, त्यामुळे हा द्वेष वाढत आहे.
भारताने अफगाणिस्तानचा विश्वास जिंकला आहे. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानचे अफगाणिस्तानविरोधी कोणतेही रहस्य उघड झाले, तेव्हा भारताने शांततेने त्याचा प्रचार केला. आज अफगाणिस्तानचे लोक दिल्ली आणि मुंबईत आहेत. ते तिथे शिकत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. याचा फायदा भारताला झाला आणि आज अफगाणिस्तानचे लोक नवी दिल्लीला आपला खरा मित्र मानतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…