
no images were found
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का?
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशजनक बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार का, याबाबतचं महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. जुन्या पेन्शन योजनेची आशा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालादरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याच जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता.
जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत. सरकारच्या या उत्तराने त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सराकारी कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक काय भूमिका याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.