no images were found
‘एनआयटी’ मध्ये मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) व टेक्निकल क्लब अंतर्गत इलेक्ट्रिकल विभागातर्फे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता ‘मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली. रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई यांच्या तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया, उत्कृष्ट बायोडाटा, अर्ज करणे, मुलाखतीची तयारी, पेहराव यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान संभाषण कौशल्य, सकारात्मक देहबोली, आपले शिक्षण; अनुभव; व्यावसायिक कौशल्ये यांचे प्रभावी सादरीकरण, हजरजबाबीपणा याबाबतच्या सांगितल्या. दर्जेदार तंत्रशिक्षणासोबत एनआयटीमधील विद्यार्थी उत्कृष्ट करिअरसाठी सुसज्ज होण्यास पोषक असा हा उपक्रम असल्याचे नमुद करत संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी तज्ञांचा परिचय तर आभारप्रदर्शन समन्वयक प्रा. प्रशांत गुरुपादगोळ यांनी केले. टिपीओ प्रा. किरण वळीवडे, प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश कट्टी, प्रा. जी एस क्षीरसागर, यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांचे उपक्रमास प्रोत्साहन लाभले. यावेळी रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, आयआयसी अध्यक्ष प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, समन्वयक प्रा. वैभव पाटणकर, विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.