no images were found
अटल मुलींना शिक्षणाचा अधिकार देण्यामध्ये यशस्वी होईल का?
अटल (व्योम ठक्कर)मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळण्याच्या खात्रीसाठी कठोर पाऊल उचलणार आहे. पालकांनी शिक्षणासाठी विरोध केल्यानंतर देखील मुली स्वत:चे घर सोडून अटलकडे मदतीसाठी जातात. सुशिला बुआचे मत असते की मुलींनी त्यांच्या पालकांची आज्ञा न मानता आणि घर सोडून चुकी केली आहे. कृष्णा देवी (नेहा जोशी) मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी लढा देण्याच्या अटलच्या निर्णयाला पाठिंबा देते. आगामी एपिसोड्सबाबत सांगताना कृष्णा देवी ऊर्फ नेहा जोशीम्हणाल्या, ”मुलींना शिक्षण मिळणार की नाही याबाबत पंचायत निर्णय घेईल. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याकरिता अटलने पंचायतला समजावण्यासाठी लक्षवेधक युक्तिवाद सादर केला पाहिजे. दरम्यान, अवधने त्याची भावंडे प्रेम व सदा यांना पुस्तके खरेदी करून देण्याचे वचन दिलेले असते, ज्यामधून तो माघार घेतो. यासंदर्भात असे समजते की त्याची पत्नी सरस्वतीने त्याला त्याच्या भावांसाठी पैसे खर्च करण्याला विरोध केलेला असतो. प्रेम अवधवर खोटा आरोप करतो की त्याने प्रेमला पैसे देण्याचे वचन दिलेले आहे, ज्यामुळे घरामध्ये तणाव वाढतो आणि अवध रागाच्या भरात प्रेमसोबत भांडण करतो. अटल हस्तक्षे पकरतो आणि अवध चुकीचे असल्याचे सांगतो. रागाच्या भरात अवध या समस्येसाठी अटलला दोषी ठरवतो. अटलविरोधातील या कठोर विधानाचा सर्वांना धक्का बसतो, ज्यामुळे अवध आणि भावंडांमध्ये आणखी एक भांडण होते. सुशिला बुआ अटलला सांगते की, प्रेम व सदाची मोठ्या भावाप्रती वागणूक अयोग्य आहे. अटल प्रेम व सदाला अवधची माफी मागण्यास समजावण्याचे वचन देतो, पण ते माफी मागण्यास नकार देतात. सुशिला बुआला वाटते की अटल भावंडांमधील समस्या सोडवू शकत नसेल तर पंचायतसमोर देखील त्याची बाजू मांडण्यामध्ये अयशस्वी ठरू शकतो.” पण, अटल प्रेम व सदाला समजावतो, जे त्यांचा मोठा भाऊ अवधच्या पाया पडत माफी मागतात. कृष्णा देवी पुढे म्हणाल्या, ”अटल दादाजींसोबत लायब्ररीमध्ये जातो आणि पंचायतसमोर मुलींच्या शिक्षणासाठी प्रबळ युक्तिवाद सादर करण्याकरिता विविध पुस्तकांचा अभ्यास करतो. दरम्यान, तोमर आणि सुशिला बुआ समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या अटलच्या प्रयत्नामध्ये विघ्न आणण्याची योजना आखतात.” अटल मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याच्या त्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होईल का की पंचायत त्याच्या विरोधात निर्णय देईल?