Home मनोरंजन सृष्टी जैनचा अफलातून वेट लॉस

सृष्टी जैनचा अफलातून वेट लॉस

9 second read
0
0
16

no images were found

सृष्टी जैनचा अफलातून वेट लॉस

 

असं मानतात की फिटनेस हा केवळ एक ट्रेंड नसून ती एक जीवनशैली आहे आणि त्यासाठी पुष्कळ समर्पण, शिस्त आणि बळकट इच्छाशक्तीची गरज असते. आपल्या खलनायकी भूमिकेसाठी मानली जाणारी ‘कुमकुम भाग्य’मधील मोनिषा ऊर्फ सृष्टी जैन हिने ह्या मालिकेत काम करायला सुरूवात केल्यापासून केवळ तीन महिन्यांमध्ये आपल्या लूक्समध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःचा कायापालट केला आहे. त्यासाठी तिने ‘इंटरमिटंट फास्टिंग’ आणि व्यायामाचे खडतर वेळापत्रक आखून घेतले आहे. तिच्या ह्या परिवर्तनाच्या प्रवासामध्ये संतुलित आहार आणि व्यायामाचा समावेश आहे.

सृष्टी जैन म्हणाली, जेव्हा कुमकुम भाग्यमध्ये 4 महिन्यांपूर्वी काम करायला सुरूवात केलीतेव्हा ऑनस्क्रीन मी जशी दिसत होते त्याबद्दल पूर्णपणे समाधानी नव्हते. त्यामुळे मग मी स्वतःसमोर फिटनेसचे ध्येय ठेवले. मी ह्या मालिकेत मोनिषाची एक गहन व्यक्तिरेखा साकारत आहे त्यामुळे मला असं वाटलं की त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी माझ्या लूकमध्येही एक प्रकारची धार असणे गरजेचे आहे. मला वाटतं ‘इंटरमिटंट फास्टिंग’चा मला चांगला फायदा झाला आहे आणि मी केवळ ३ महिन्यांमध्ये ८ किलो वजन कमी करू शकले आहे. तेवढचे नाही तर मी दररोज स्वतःला मेंटेन राखण्यासाठी मेहनत घेते. आणि हे केवळ माझे वर्कआऊट रूटिन आणि डाएट पाळूनच करणे शक्य आहे.”

ती पुढे म्हणाली, माझ्या डाएटमध्ये फक्त घरी बनवलेले जेवण आणि त्यात योग्य प्रमाणात प्रोटिन्स आणि कार्ब यांचा समावेश असतो. मी हर्बल चहाचेसुद्धा घुटके घेत राहते आणि आठवड्‌यातून दोन वेळा डिटॉक्स वॉटरसह क्लिंजिंगही करते. सेटवर मी चालते आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा जिममध्ये वर्क आऊट करते.”

सृष्टीमधील हा कायापालट वाखाणण्यासारखा असून प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की कशी पूर्वी (राची शर्मा) आणि आरव्ही (अब्रार काझी) हे मालिकेत सर्वांना हायजॅकर्सपासून वाचवतील. काय ह्या परिस्थितीमुळे त्यांना एकमेकांवरील खऱ्या प्रेमाची जाणीव होईल? त्यांना वेगळे करण्यासाठी मोनिषाची पुढील चाल काय असेल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…