
no images were found
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठातील परिक्षा स्थगित
कोल्हापूर : मागील २ दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत.
यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परिक्षा स्थगित होणार असल्याची माहिती संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात ओढे नाले नद्यांना पूर आल्याने गावांचा शहरापासूनचा संपर्क तुटला असल्याने याबद्दल खबरदारी घेत विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.